मुंबई : क्रिकेटला जगभरात फॉलोअर्स नसले तरी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा महिमा सर्वदूर आहेत. एका वेबसाईटनं केलेल्या सर्व्हेक्षणानुसार जगातील सर्वात फेमस खेळाडूंमध्ये कोहलीनं मानाचं स्थान पटकावलं आहे. या क्रमवारीत अव्वल दहामध्ये स्थान पटकावणारा तो एकमेव भारतीय खेळाडू आहे. अपेक्षेनुसार युव्हेटस क्लबचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर NBA बास्केटबॉल स्टार लेब्रॉन जेम्स आणि बार्सिलोना क्लबचा फुटबॉलस्टार लिओनेल मेस्सी यांचा क्रमांक येतो.
सोशल मीडियावर रोनाल्डोचे एकूण 344.3 मिलियन फॉलोअर्स आहेत. त्यानंतर पॅरिस सेंट-जर्मेनचा नेयमार ( 208.9 मिलियन) आणि मेस्सी ( 191.7 मिलियन) यांचे सोशल मीडियावर जादा चाहते आहेत. उत्पनाच्या बाबतित जेम्स हा 52 मिलियन अमेरिकन डॉलरसह आघाडीवर आहे. त्यानंतर स्टीफन करी आणि टायगर वूड्स यांच्या क्रमांक येतो. दोघांची कमाई प्रत्येकी 42 मिलियन अमेरिकन डॉलर इतकी आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून या वेबसाईटनं केलेल्या सर्व्हेक्षणात रोनाल्डो अव्वल 100 खेळाडूंमध्ये पहिल्या क्रमांकावर येतो.
जगातले अव्वल 20 खेळाडूख्रिस्तियानो रोनाल्डोलेब्रॉन जेम्सलिओनेल मेस्सीनेयमारकॉनोर मॅकग्रेगोररॉजर फेडररविराट कोहलीराफेल नदालस्टीफन करीटायगर वूड्सकेव्हीन डुरांटपॉल पोग्बामहेंद्रसिंग धोनीकायलिन मॅबाप्पेखबीब नुर्मागोमेडोव्हअँटोनी ग्रिझमनसेरेना विल्यम्सयुवराज सिंगमेसूट ओझीलनोव्हाक जोकोव्हिच
या शंभर खेळाडूंच्या यादीत कोहलीनं अव्वल दहामध्ये स्थान पटकावले आहे. त्याच्याशिवाय यादित धोनी ( 13), युवराज (18), सुरेश रैना ( 22), रोहित शर्मा ( 46), हरभजन सिंग (74), रविचंद्रन अश्विन ( 42), मुशफिकर रहिम ( 92), शिखर धवन ( 94), मश्रफे मोर्ताझा ( 98) आणि शकिब अल हसन ( 99) या क्रिकेटपटूंचा समावेश आहे.
गतवर्षी या खेळाडूंमध्ये गौतम गंभीर व एबी डिव्हिलियर्स यांचेही नाव होते, परंतु यंदा त्यांना अव्वल 100 मध्ये स्थान पटकावता आले नाही. कोहलीनं प्रथमच अव्वल दहामध्ये स्थान मिळवले. गतवर्षी तो 11व्या स्थानावर होता. महिला खेळाडूंमध्ये सेरेना ( 17) आघाडीवर आहे, तर मारिया शारापोव्हा ( 37) आणि सानिया मिर्झा ( 93) यांनी अव्वल शंभरमध्ये स्थान पटकावले.