Join us  

भारतात वर्ल्ड क्लास फलंदाज तयार करणार हे मशीन; १५५ च्या वेगाने फेकते चेंडू, खेळाडूला फिरकीवरही नाचवणार!

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीयांचा दबदबा किती आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 9:04 AM

Open in App

एकाच वेळी भारतीय संघ २-३ आंतरराष्ट्रीय संघ मैदानावर उतरवू शकतो, एवढे चांगले खेळाडू आपल्याकडे आहेत. स्थानिक क्रिकेटमध्येही आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा पुरवल्या जात असल्यामुळे भारतात स्टार क्रिकेटपटू तयार होत आहेत. अशात मेरठ येथील क्रिकेटपटूंसाठी आनंदाची बातमी आली आहे. मेरठ येथील एक कंपनी BDM आणि स्वीप अँड स्पिन यांनी अशी मशीन तयार केली आहे जी येणाऱ्या काळात भारताला आणखी वर्ल्ड क्लास फलंदाज देण्याचे काम करणार आहे. 

भारतीय फलंदाजांना आपले कौशल्य आणखी सुधारण्यासाठी हे मशीन मदत करणार आहे. मेरठच्या BDM क्रिकेट अकादमीत ऑटोमॅटिक बॉलिंग मशीन बसवण्यात आले आहे. या मशीनच्या मदतीने फलंदाज कितीही वेगाने येणाऱ्या चेंडूचा सामना करण्यासाठी तयारी करू शकतो. दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहन जेटली यांनी मेरठमध्ये जाऊन या मशीनची पाहणी केली. त्यांच्या हस्ते या मशीनचे उद्धाटन केले गेले.

 ही जगातील पहिली ऑटोमॅटिक बॉलिंग मशीन आहे. यातून १५५kmphच्या वेगाने चेंडू फेकला जाऊ शकतो. याशिवाय हे मशीन जलदगती चेंडू, स्लोव्हर, इन स्विंग, स्पिन असे सर्व प्रकारचे चेंडू फेकू शकते. खेळाडू Wifi च्या मदतीने हे मशीन लॅपटॉप किंवा मोबाईलला कनेक्ट करू शकतात. १ किलोमीटरच्या अंतरावर हे डिव्हाईस कनेक्ट करू शकतो. एका वेळी एकाच डिव्हाईससोबत हे मशीन कनेक्ट होते. त्यामुळे Data चोरीचा प्रकार होणार नाही.  

हे मशीन दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेच्या सर्व क्लब्समध्ये बसवण्यात यावे अशी विनंती केली जाणार आहे. BCCI कडून तिला मान्यता मिळण्यासाठी चर्चा सुरू आहे.  

टॅग्स :तंत्रज्ञानबीसीसीआय
Open in App