Join us

जग चंद्रावर पोहोचलं अन् पाकिस्तानातील मुर्ख बगलेतील केस पाहत आहेत; वसीम अक्रम संतापला

पाकिस्तानचा महान गोलंदाज वसीम अक्रम ( Wasim Akram) ऑस्ट्रेलियात लाईफ एन्जॉय करत आहे आणि तेथे समालोचकाच्या भूमिकेतही तो दिसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 14:50 IST

Open in App

(Marathi News) :  पाकिस्तानचा महान गोलंदाज वसीम अक्रम ( Wasim Akram) ऑस्ट्रेलियात लाईफ एन्जॉय करत आहे आणि तेथे समालोचकाच्या भूमिकेतही तो दिसला. वन डे वर्ल्ड कप २०२३ स्पर्धेसाठी पाकिस्तानातील स्टुडिओतून समालोचन केल्यानंतर माजी खेळाडू ऑस्ट्रेलियात दाखल झाला. तो त्याच्या पत्नीसोबत तिथे गेला आहे आणि त्याने नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान कसोटी मालिकेत समालोचनही केले. त्याचवेळी तो सोशल मीडियावरही सक्रिय होता.

एका युजरने अक्रमच्या एका पोस्टवर विचित्र कमेंट केली आणि त्याचा गोलंदाजाने चांगलाच समाचार घेतला. अक्रमने पोस्ट केलेल्या फोटोत मायकेल वॉन, मार्क वॉ व रवी शास्त्री दिसत आहेत. पण, त्या युजरने अक्रमच्या बगलेतील केसांवर आक्षेप घेतला आणि त्याता सडेतोड उत्तर मिळाले.

अक्रमने त्या युजरला म्हटले की, जग चंद्रावर पोहोचले आणि माझ्या देशातील मुर्ख अजूनही बगलेतील केस पाहत आहेत. याने एक देश म्हणून आपण अजून कुठे आहोत हे दिसते आणि आपली संस्कृतीला हे लाजवणारे आहे. 

पाकिस्तानची नाचक्कीयजमान ऑस्ट्रेलियाने ३ सामन्यांची कसोटी मालिका ३-० अशी जिंकली आणि जागतिक अजिंक्यपद कसोटीच्या गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. सिडनी कसोटीत डेव्हिड वॉर्नरने घरच्या मैदानावर अखेरच्या कसोटी डावात ५७ धावा करून ११२ कसोटी सामन्यांच्या कारकिर्दीला अलविदा केला.  त्याचवेळी ऑस्ट्रेलियाने शनिवारी तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात पाकिस्तानला आठ गडी राखून नमविताना ३-० असा क्लीन स्वीप दिला. 

मोहम्मद रिजवान ( ८८), आगा सलमान ( ५३) व आमेर जमाल ( ८२) यांच्या फटकेबाजीने पाकिस्तानने पहिल्या डावात ३१३ धावा केल्या.  ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात २९९ धावा करता आल्या. जमालने ६९ धावांत ६ विकेट्स घेतल्या. १४ धावांची आघाडी मिळवूनही पाकिस्तानचा दुसरा डाव ११५ धावांवर गडगडला. सईम आयुब ( ३३) सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. जोश हेझलवूड ( ४-१६) व नॅथन लियॉन ( ३-३६) यांनी चांगली गोलंदाजी केली. ऑस्ट्रेलियाने २५.५ षटकांत हा विजय मिळवला. डेव्हिड वॉर्नर व मार्नस लाबुशेन यांनी मॅच विनिंग अर्धशतक झळकावले.   

टॅग्स :वसीम अक्रमऑफ द फिल्ड