Join us

World Record! T10 मध्ये फलंदाजाच्या ४३ चेंडूंत नाबाद १९३ धावा; 22 sixes, 14 fours

T10 क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड खेळी पाहायला मिळाली..

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2023 12:57 IST

Open in App

World Record Knock by Hamza Saleem Dar - T10 क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड खेळी पाहायला मिळाली.. ६० चेंडूंच्या डावात हमझा सलीम दार या फलंदाजाने एकट्याने ४३ चेंडू खेळून काढली आणि नाबाद १९३ धावा चोपल्या. European Cricket Series (ECS) मधील कॅटालुन्या जॅग्वार विरुद्ध सोहल हॉस्पिटलेट ( Catalunya Jaguar vs Sohal Hospitalet) यांच्यातल्या या सामन्यात हा भीमपराक्रम झाला. CJG संघाने प्रथम फलंदाजी करताना १० षटकांत २५७ धावांचा डोंगर उभा केला.

पण, या सामन्यात चर्चेत राहिला तो हमझा... डावखुऱ्या फलंदाजाने ४३ चेंडूंत २२ षटकार व १४ चौकार खेचले. त्याने T10 क्रिकेटमध्ये सर्वोत्तम वैयक्तिक खेळीचा विक्रम केला. त्याने संघाच्या एकूण धावसंख्येपैकी ७५% धावा एकट्याने केल्या. त्याचा स्ट्राईक रेट हा ४४९ इतका होता. हमझाच्या या वादळी खेळीचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला गेला आहे.  

हमझाने नाबाद १९३ धावा करून लीयूस ड्यू प्लूयचा T10 लीगमधील सर्वोत्तम धावसंख्येचा विक्रम मोडला. हमझाने ३ अतिरिक्त चेंडूचा सामना करताना ड्यू प्लूयपेक्षा ३० धावा जास्त केल्या. CJG संघाने १५३ धावांनी हा सामना जिंकला. सोहल संघाला ८ बाद १०४ धावाच करता आल्या. 

टॅग्स :टी-10 लीग