केपटाउनः स्फोटक फलंदाज, चपळ-चलाख यष्टिरक्षक, जबरदस्त क्षेत्ररक्षक आणि कधी-कधीच, पण चतुराईने गोलंदाजी करणारा फिरकीपटू एबी डिविलियर्सनं आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. आयपीएलमध्ये झंझावाती कामगिरी करून तो नुकताच मायदेशी परतला होता. त्यानंतर त्यानं तडकाफडकी निवृत्तीची घोषणा करून तमाम क्रिकेटप्रेमींना धक्का दिला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील वादळ म्हणूनच त्याच्याकडे पाहिलं गेलं आणि यापुढेही तो तसाच लक्षात राहील. या वादळाने रचलेले काही भन्नाट विक्रम....
>> वनडेतील सर्वात वेगवान शतक. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात चौकार, षटकारांची आतषबाजी करत अवघ्या ३१ चेंडूत साकारलं शतक. कोरे अँडरसनचा ३६ चेंडूतील शतकाचा विक्रम मोडला. जोहान्सबर्गमध्ये झालेल्या या सामन्यात त्यानं ४४ चेंडूत १४९ धावांची लयलूट केली होती.
>> वनडेतील वेगवान अर्धशतकाचा विक्रमही एबीडीच्या नावावर आहे. त्यानं अवघ्या १६ चेंडूत ६० धावा कुटल्या होत्या.
>> ४० मिनिटांत १०० धावा करणारा वीर.
>> १९ मिनिटांत केली होती ५० धावांची खेळी.
>> एका सामन्यात सर्वाधिक १६ षटकार ठोकण्याचा विक्रम भारताच्या रोहित शर्मासोबत डिविलियर्सच्या नावावर जमा आहे.
>> ३३८.६३ हा वनडेतील सर्वाधिक स्ट्राइक रेट एबीडीच्या खात्यावर जमा आहे.
>> कसोटी क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वाधिक वैयक्तिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा शिलेदार. पाकिस्तानविरुद्ध केली होती २७८ धावांची खेळी. हाशिम आमलानं इंग्लंडविरोधात झळकावलं होतं त्रिशतक.
>> वनडेतील पदार्पणाचा इंग्लंडविरुद्धचा सामना 'टाय' झाला होता.
Web Title: world records by AB de Villiers in international cricket
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.