World Test Championship Final Race : क्रिकेटच्या पंढरीत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल खेळण्याच्या शर्यतीत भारतीय संघ टॉपला आहे. त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलिया संघ दुसऱ्या स्थानावर आहे. पण ही शर्यत एवढी सोपी असणार नाही. आतापर्यंत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील फायनल रंगेल, असे बोलले चित्रत दिसत होते. पण श्रीलंकेच्या संघानं घरच्या मैदानात गत WTC चॅम्पियन न्यूझीलंडचा बुक्का पाडला. या सामन्यातील निकालानंतर WTC साठीच्या फायनलच्या शर्यतीत दोघांत तिसरा असा सीन क्रिएट झाला आहे. याचा अर्थ असा की, इंग्लंडच्या मैदानात चांदीच्या गदेसाठी दोन आशियाई संघही भिडू शकतात. एक नजर टाकुयात फायनलच्या मार्गात लंकेसमोर कुणाचं असेल चॅलेंज
WTC फायनलच्या शर्यतीतील आघाडीचे ३ संघ (World Test Championship 2023-25 points table Top 3 Team)
भारतीय संघ आतापर्यंत खेळलेल्या १० सामन्यातील ७ सामन्यातील विजय, २ पराभव आणि एका अनिर्णित सामन्यासह ७१.६७ गुणांसह आघाडीवर आहे. टीम इंडियाचा बांगालादेश विरुद्धचा कानपूर कसोटी सामन्याचा निकाल लागण अशक्य वाटते. यापरिस्थितीत टीम इंडियाची विजयाची टक्केवारी सत्तरीच्या आत येईल. ऑस्ट्रेलियन संघ १२ सामन्यातील ८ विजय ३ पराभव आणि एका अनिर्णित सामन्यातील निकालासह ६२.५० विजयी टक्केवारीसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्यापाठोपाठ न्यूझीलंडला नमवत श्रीलंकेचा संघ ९ सामन्यातील ५ विजय ४ पराभवासह ५५.५६ विजयी टक्केवारीसह तिसऱ्या स्थानावर आहे.
श्रीलंकेसाठी एक पेपर खूप अवघड तर एक बऱ्यापैकी सोपा
श्रीलंकेचा संघ नोव्हेबर डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकच्या दौऱ्यावर दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. हा पेपर त्यांच्यासाठी सर्वात अवघड असेल. WTC फायनलच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी त्यांना आधी हे मैदान गाजवावे लागेल. त्यानंतर पुढच्या वर्षी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये श्रीलंकेचा संघ घरच्या मैदानात नंबर दोनवर असलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळेल. ही मालिका ते घरच्या मैदानावर खेळणार असल्यामुळे ऑस्ट्रेलियाला मागे टाकणे त्यांना दक्षिण आफ्रिकेच्या तुलनेत सोपे जाईल.
बॉर्डर-गावसकर ट्रॉफी
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी होणाऱ्या पाच सामन्यांच्या मालिकेवरही बरेच काही अवलंबून आहे. इथं दोन्ही पैकी एका संघाने एकतर्फी बाजी मारली तर श्रीलंकेचे काम बऱ्यापैकी सोपे होईल. श्रीलंकेसाठी प्रवास खडतर असला तर एक संधी त्यांनी निर्माण केली आहे. इंग्लंड, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज यांच्या तुलनेत ते खूप पुढे आहेत.