‘आगामी अॅशेस मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदाची धुरा पुन्हा एकदा स्टीव्ह स्मिथकडे सोपविण्यात आली, तर ऑस्ट्रेलियन संघावर संपूर्ण जग हसेल,’ असे वक्तव्य ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टिरक्षक-फलंदाज इयान हिली याने केले.
२०१८ साली चेंडू छेडछाड प्रकरणी स्मिथला एक वर्ष निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले होते. काही दिवसांपूर्वीच टिम पेन याने महिला सहकारीला अश्लील मेसेज पाठविल्याप्रकरणी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. सध्या ऑस्ट्रेलिया कसोटी संघाचे कर्णधारपद रिक्त आहे. यासाठी पुन्हा एकदा स्मिथच्या नावाचा विचार होत आहे.
याबाबत हिलीने म्हटले की, ‘स्मिथला पुन्हा कर्णधार नेमल्यास ऑस्ट्रेलियावर सगळेजण हसतील. स्मिथला पुन्हा कर्णधार नेमण्यास माझा आक्षेप नाही. पण त्याने आळशी कर्णधार होण्याचा मोठा फटका भोगला आहे.’ पेनच्या कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयावर हिलीने सांगितले की, ‘हा पेनचा स्वत:चा निर्णय होता. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्याला कर्णधारपदाव कायम राहू शकतोस, असे सांगितले आहे. प्रशिक्षकांचीही ही इच्छा आहे, पण त्याला हे पद सध्या नकोय.’