world womens day, Maroof Bismah : ७ महिन्याच्या मुलीला घेऊन 'ती' वर्ल्ड कप खेळायला आली; अर्धशतक झळकावताच लेकीसाठी खास सेलिब्रेशन, Video

पाकिस्तानची कर्णधार बिस्माह मरूफ ( Captain Bismah Maroof) ही तिच्या सहा महिन्यांच्या मुलीला सोबत घेऊन न्यूझीलंडमध्ये दाखल झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 10:12 AM2022-03-08T10:12:55+5:302022-03-08T10:13:25+5:30

whatsapp join usJoin us
world womens day, Just second match into her comeback after childbirth and Pakistan's captain Maroof Bismah scores a half-century and she dedicates it to her daughter, Fatima, Watch Video  | world womens day, Maroof Bismah : ७ महिन्याच्या मुलीला घेऊन 'ती' वर्ल्ड कप खेळायला आली; अर्धशतक झळकावताच लेकीसाठी खास सेलिब्रेशन, Video

world womens day, Maroof Bismah : ७ महिन्याच्या मुलीला घेऊन 'ती' वर्ल्ड कप खेळायला आली; अर्धशतक झळकावताच लेकीसाठी खास सेलिब्रेशन, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC Women's World Cup, Australia vs Pakistan : आयसीसी महिला वर्ल्ड कप स्पर्धेतील भारत-पाकिस्तान यांच्यातल्या सामन्यानंतर जे प्रेम व ममत्वाचे चित्र पाहायला मिळाले, त्याचे जगाने कौतुक केले. मैदानावर कट्टर प्रतिस्पर्धी असलेले दोन्ही देशांचे खेळाडू मैदानाबाहेर एका कुटुंबासारखे दिसले. पाकिस्तानची कर्णधार बिस्माह मरूफ ( Captain Bismah Maroof) ही तिच्या सात महिन्यांच्या मुलीला सोबत घेऊन न्यूझीलंडमध्ये दाखल झाली आहे. India vs Pakistan लढतीनंतर भारतीय खेळाडू मरूफची कन्या फातिमा ( Fatima) हिच्यासोबत खेळताना दिसले. आज ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात मरूफने अर्धशतकी खेळी करून मुलीसाठी खास सेलिब्रेशन केलं आणि तो व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.  

आई झाल्यानंतर सात महिन्यांतच मरूफने क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन केले आणि आज ती तिचा दुसरा सामना खेळतेय. २८ नोव्हेंबर २०१८मध्ये मरूफने अबरार अहमद याच्याशी विवाह केला. अबरार हा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे . मरूफला सुरुवातीला क्रिकेटपटू नव्हे तर डॉक्टर बनायचे होते, पण कुटुंबीयांच्या सांगण्यावरून ती क्रिकेटपटू झाली. ३० वर्षीय मरूफ ही अष्टपैलू आहे. मागच्या वर्षी ३० ऑगस्टला तिच्या मुलीचा जन्म झाला आणि काही काळ ती क्रिकेटपासून दूर होती. 


आज ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत मरूफने १२२ चेंडूंत ८ चौकारांच्या मदतीने नाबाद ७८ धावांची खेळी केली आणि वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तानी महिलेने केलेली ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. या सामन्यात आलिया रियाझने १०९ चेंडूंत ५३  धावा केल्या. या दोघांच्या अर्धशतकांच्या जोरावर पाकिस्तानने ६ बाद १९० धावा केल्या. अर्धशतक झळकावल्यानंतर मरूफने पेव्हेलियनमध्ये उपस्थित असलेल्या लेक फातिमासाठी खास सेलिब्रेशन केले. 

Web Title: world womens day, Just second match into her comeback after childbirth and Pakistan's captain Maroof Bismah scores a half-century and she dedicates it to her daughter, Fatima, Watch Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.