Join us  

सलामी जोडीची चिंता कायम

भारताने पहिला आणि आॅस्ट्रेलियाने दुसरा कसोटी सामना जिंकला. त्यामुळे मालिकेत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 4:54 AM

Open in App

- अयाझ मेमन (संपादकीय सल्लागार)भारताने पहिला आणि आॅस्ट्रेलियाने दुसरा कसोटी सामना जिंकला. त्यामुळे मालिकेत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. आता २६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्यात आघाडी कोण घेणार, याची उत्सुकता असेल. परंतु, पहिला सामना गमावल्यानंतर ज्याप्रकारे आॅस्ट्रेलियाने मुसंडी मारली त्यावरून त्यांचे पारडे जड असल्याचे दिसत आहे. त्यामुळे भारतावर थोडा दबाव असेल. आता भारतीय संघाच्या निवडीबाबतही समस्या असतील. कारण, सलामीवीर अजूनही स्थिरावलेले नाहीत. जडेजाला खेळवायचे की हार्दिक पांड्याला. रविचंद्रन आश्विन तंदुरुस्त आहे की नाही? असे प्रश्नही आहेत. संघात समतोलही दिसत नाही. त्यामुळे विराटपुढे मोठे प्रश्न असतील.सलामी जोडीबाबत सांगायचे झाल्यास लोकेश राहुल फॉर्ममध्ये नाही. त्यामुळे त्याला संधी मिळणार नाही. मुरली विजयने अधिक धावा केल्या नसल्या तरी त्याने मैदानावर वेळ काढला आहे. त्यामुळे तो खेळेल. अशा परिस्थितीत मयांक अग्रवाल हा पहिला कसोटी सामना खेळू शकतो. हनुमा विहारी हा त्याची साथ देईल किंवा रोहित शमार्लाही बोलविले जाईल.गोलंदाजीत दोन फिरकीपटू खेळविणे कठीण आहे. गेल्या सामन्यात एकच फिरकीपटू खेळवला त्यामुळे विराट आणि शास्त्रीवर टिका झाली. माझ्या मते, आपण एक फिरकीपटू होता म्हणून पराभूत झालो नाही, तर धावा कमी काढल्या गेल्या. भारताची फलंदाजी ढेपाळल्याने संघाने सामना गमावला. तळाच्या फळीकडून धावांच्या अपेक्षा करणे चुकीचे आहे. कारण धअआ काढण्याची मुख्य जबाबदारी प्रमुख फलंदाजांची आहे.बॉक्सिंग डे सामन्याची उत्सुकता...आॅस्टेÑलियाप्रमाणे, इंग्लंडमध्येही २६ डिसेंबर रोजीच बॉक्सिंग डे सामना खेळविला जातो. आॅस्ट्रेलियात या दिवशी सुट्टी असते. प्रत्येक वर्षी या सुट्टीच्या दिवशी मेलबर्नमध्येच सामना खेळविला जातो. त्याचे स्थळही कायमस्वरूपी हेच असते. हा सामना पाहण्यासाठी ९० हजारांहून अधिक प्रेक्षक हजेरी लावतात. एवढ्या मोठ्या प्रमाणातील प्रेक्षकांपुढे खेळणे मोठे आव्हानात्मक असते. त्यामुळे भारतावर दबाव असेल. अधिक प्रेक्षकांपुढे विराट कोहली उत्साहाने खेळतो. इतरांबाबत मात्र चिंता आहे.महिला क्रिकेटमधील वाद घातकडब्ल्यू व्ही. रमण हे भारताकडून खेळले आहेत. त्यांना मोठा अनुभव आहे. समजूतदार व्यक्ती आणि चांगला खेळाडू म्हणून रमण यांची ओळख आहे. मात्र, महिला क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने वाद झाला तो चांगला नाही. कारण, आता कुठे महिला क्रिकेट प्रगतीपथावर आहे. रमेश पोवार हा बळीचा बकरा बनला. कारण, हा वाद मिताली राज व पोवार यांच्यात होता. तो हरमनप्रीतपर्यंत पोहोचला होता. आता प्रशिक्षकपदासाठी तीन नावांची चर्चा होती. त्यात गॅरी कर्स्टन आघाडीवर होते. मात्र, ते आयपीलमध्ये असल्याने त्यांना अपात्र ठरविण्यात आले. असे असेल तर त्यांचे नाव शॉर्टलिस्ट कसे केले? हा एकप्रकारे तमाशा बनलाय.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया