लंडन : इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यात शुक्रवारी झालेल्या सामन्यात यजमान इंग्लंडने बाजी मारली. आयर्लंडचे 199 धावांचे लक्ष्य इंग्लंडने 42 षटकांत 6 विकेट्सच्या मोबदल्यात पार केले. यष्टिरक्षक बेन फोक्सने क्षेत्ररक्षणात आणि फलंदाजीत आपले योगदान देत इंग्लंडच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. त्याने दोन झेल व एक स्टम्पिंग केले, तर फलंदाजीत नाबाद 61 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. पण, त्याच्या स्टम्पिंगने नव्या वादाला तोंड फोडले आहे. सोशल मीडियावर त्याच्या खिलाडूवृत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहेत.
आयर्लंडचा संघ फलंदाजी करत असताना 25व्या षटकात हा प्रसंग घडला. आयर्लंडचा फलंदाज अँडी बॅल्बीर्नीला यष्टिरक्षक फोक्सने चतुराईने यष्टिचीत करून माघारी पाठवले. जो डेन्लीच्या गोलंदाजीवर स्वीप फटका मारण्याचाय बॅल्बीर्नीचा प्रयत्न फसला आणि चेंडू थेट फोक्सच्या हातात गेला. त्यानंतर फलंदाजाचा पार वर होईपर्यंत तो थांबला आणि त्वरित चेंडूनं बेल्स पाडून अपील केले. तिसऱ्या पंचांनी बॅल्बीर्नीला बाद ठरवले.
फोक्सच्या या स्टम्पिंगची तुलना सोशल मीडियावर आर अश्विनच्या मांकड धावबाद प्रकरणाशी करू लागले. किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार असलेल्या अश्विनने राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलरला मांकड धावबाद केल्यानंतर मोठा वाद झाला होता. त्यावरून अश्विनवर टीकाही झाली होती.
बॅल्बीर्नीने 44 चेंडूंत 29 धावा करत आयर्लंडला 43.1 षटकांत 10 बाद 198 धावांचा पल्ला गाठून दिला. प्रत्युत्तरात इंग्लंडचे पाच फलंदाज अवघ्या 66 धावांवर माघारी परतले होते. पण, फोक्सने एक बाजू लढवली आणि डेव्हिड विली ( 20) व टॉम कुरन ( 47) यांच्यासोबत अनुक्रमे 45 व 98 धावांची भागीदारी करताना इंग्लंडला विजय मिळवून दिला.
राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजाची इंग्लंडमध्ये कमाल, आंतरराष्ट्रीय पदार्पणात उडवून दिली धमाल
राजस्थान रॉयल्स प्रमुख अष्टपैलू खेळाडू जोफ्रा आर्चरने आज इंग्लंडच्या आंतरराष्ट्रीय संघाकडून पदार्पण केले आहे आणि पदार्पणातच त्याने आपली झलक दाखवली. त्याने आयर्लंडच्या पी. स्टर्लिंगचा अप्रतिम झेल घेतला त्यानंतर त्याने एम अॅडेरचा त्रिफळा उडवून पहिला आंतरराष्ट्रीय बळी मिळवला. त्याने आठ षटकात 40 धावा देत एक विकेट घेतली होती.
Web Title: 'Worse than Mankading' Twitter slams Ben Foakes after controversial stumping in England vs Ireland one-off ODI
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.