रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नेतृत्वाखाली Indian Premier League ( IPL 2020) च्या 13 व्या पर्वाचे जेतेपद पटकावून मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) पाचव्या चषकावर नाव कोरले. MI हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ आहे. रोहितनं कर्णधार म्हणून पाच जेतेपद जिंकली आहेत, तर खेळाडू म्हणून सर्वाधिक 6 आयपीएल चषक उंचावणारा तो एकमेव खेळाडू आहे. त्यानं डेक्कन चार्जर्सकडून एक जेतपद जिंकले आहे. मुंबई इंडियन्सच्या पाचव्या जेतेपदानंतर रोहितच्या नेतृत्वकौशल्याचे कौतुक होऊ लागले.
रोहितला टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 व वन डे संघाचे कर्णधार बनवावे अशी मागणी चाहत्यांनी पुन्हा एकदा केली. त्यात भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर यानंही रोहितचं कौतुक करताना त्याला टीम इंड़ियाच्या मर्यादित षटकांच्या संघाचे कर्णधार बनवावे अशी मागणी केली. तो म्हणाला, तसे न केल्यास ते टीम इंडियाचे मोठे नुकसान असेल. त्यानं विराट कोहलीच्या नेतृत्वावरही सवाल उपस्थित केला. कोहलीला अजून एकदाही IPL चे जेतेपद पटकावता आलेले नाहीत.
गंभीर म्हणाला,''रोहित टीम इंडियाचा कर्णधार न झाल्यास, ते संघाचे नुकसान असेल, रोहितचे नाही. रोहितच्या नेतृत्वाखाली संघानं पाच आयपीएल जेतेपदं जिंकली आहेत. आपण नेहमी म्हणतो की महेंद्रसिंग धोनी हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. का, तर त्यानं दोन वर्ल्ड कप व तीन आयपीएल जिंकलेत म्हणून? रोहितनं पाच आयपीएल जेतेपद जिंकली आहेत आणि या स्पर्धेतील तो सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्यामुळेच त्याला टीम इंडियाच्या व्हाईट बॉल किंवा फक्त ट्वेंटी-20 संघाचा कर्णधार न केल्यास, यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट नसेल.''
गौतम गंभीरच्या या मागणीवर आकाश चोप्रानं महत्त्वाचा प्रश्न विचारला. चोप्रानं फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट केला. त्यात तो म्हणतो,''रोहित शर्माला भारताच्या ट्वेंटी-20 संघाचे कर्णदारपद न दिल्यास हे संघाचे दुर्भाग्य असेल, असे गौतम गंभीरला वाटते. कारण की रोहितनं सर्वाधिक आयपीएल जेतेपद जिंकली आहेत, परंतु माझा एक प्रश्न आहे की, रोहितकडे सध्याचा RCBचा संघ सोपवल्यास तो MI सारखेच विराटच्या संघाला दोन, तीन, चार किंवा पाच जेतेपद जिंकून देऊ शकेल का?''
पाहा व्हिडीओ...