पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तर ( Shoaib Akhtar) यानं पुन्हा वादग्रस्त विधान केलं. पण, यावेळी त्यानं भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग ( Virender Sehwag) याला मारण्याची भाषा केली. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांच्या क्रिकेट सामन्यांमध्ये अनेक मजेशीर किस्से आहेत आणि ते वारंवरा ऐकावेत असे क्रिकेट चाहत्यांना वाटते. त्यापैकी एक किस्सा सेहवाग आणि अख्तर यांच्यात घडला होता. त्याच प्रसंगावर अख्तरनं विधान करताना सेहवागला हॉटेलपर्यंत मारत नेले असते असे मत व्यक्त केलं. Unseen Photo : विराट कोहलीचा गुरूग्राम येथील ८० कोटींचा आलिशान बंगला पाहिलात का?
16 वर्षांपूर्वी जेव्हा वीरूनं मुल्तान कसोटीत पाकिस्तानविरुद्ध 309 धावांची खेळी केली होती. भारताकडून कसोटीत त्रिशतक झळकावणारा तो पहिला फलंदाज ठरला होता. त्या सामन्यात सेहवागनं पाकिस्तानी गोलंदाजाला डिवचले होते. 2004च्या त्या सामन्यात अख्तर सातत्यानं आखडता चेंडू टाकून सेहवागला त्रास देत होता. सेहवागला त्यानं हुक शॉट मारण्यास सांगितले, परंतु तेव्हा वीरूनं नॉन स्ट्रायकर एंडला असलेल्या सचिन तेंडुलकरला अशी गोलंदाजी करण्याचा इशारा केला. त्यानंतर तेंडुकरनं अख्तरचा शॉर्ट बॉलवर चौकार खेचला. तेव्हा वीरूनं, बाब-बाप असतो अन् मुलगा-मुलगा. असे म्हणून अख्तरला डिवचले होते. Video : भारतातील कोरोनाच्या भयाण परिस्थितीबाबत सांगताना रडू लागला KKRचा फलंदाज
16 वर्षांनंतर अख्तरला पुन्हा या प्रसंगाबद्दल विचारण्यात आले. तेव्हा तो म्हणाला,''सेहवाग मला असं बोलून वाचला असता का?मी त्याला असंच सोडलं असतं का? त्याला मैदानावर तर मारलंच असतं आणि त्यानंतर हॉटेलमध्येही त्याला सोडलं नसतं.'' पहिल्या विकेटसाठी चार फलंदाजांची ४०८ धावांची भागीदारी, चौघांचेही शतक; क्रिकेटच्या इतिहासातील अजुबा!