Join us  

WPL 2023, MI vs RCB : ४ धावांत ४ विकेट्स! स्मृती मानधनाच्या RCBची घसरगुंडी; Mumbai Indiansची पाचवी विकेट ढापली?

WPL 2023, MI vs RCB : महिला प्रीमिअर लीगच्या २०२३ आजचा सामना चाहत्यांसाठी खास आहे. भारतीय महिला संघातील दोन स्टार स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौर आमनेसामने आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2023 8:24 PM

Open in App

WPL 2023, MI vs RCB : महिला प्रीमिअर लीगच्या २०२३ आजचा सामना चाहत्यांसाठी खास आहे. भारतीय महिला संघातील दोन स्टार स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौर आमनेसामने आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची कर्णधार स्मृतीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. स्मृती व सोफी डिव्हाईन यांनी चांगली सुरुवात करून देताना ४.२ षटकांत फलकावर ३९ धावा चढवल्याय. पण, त्यानंतर हरमनप्रीतने फिरकी गोलंदाजांना मैदानावर आणले आणि ४ धावांत ४ विकेट्स पडल्या. 

पहिल्या सामन्यात चार विकेट्स घेणाऱ्या साइका इसाकने RCBला पहिला धक्का दिला. सोफी १६ धावांवर झेलबाद झाली. त्याच षटकात एक चेंडू सोडून दिशा कसत (०) हिचा त्रिफळा उडवला. हिली मॅथ्यूजने पुढील षटकात सलग दोन धक्के दिले. स्मृती २३ धावांवर झेलबाद झाली आणि पुढच्याच चेंडूवर हिदर नाइटचा त्रिफळा उडवला. बिनबाद ३९ वरून RCBची अवस्था ४ बाद ४३ अशी झाली. रिचा घोष व पेरी ही जोडी RCBचा डाव सावरताना दिसली अन् त्यांना दोन वेळा रन आऊट करण्याची संधी MI ने गमावलेली. त्यात नॅट शिव्हर-ब्रंटच्या बाऊंसरवर रिचासाठी झेलची जोरदार अपील झाले. DRS घेतला गेला अन् त्यात बॅट व बॉलच संपर्क झाल्याचे दिसत होते, परंतु Ultra Edge मध्ये तसे काहीच दिसले नाही आणि रिचाला जीवदान मिळाले. कर्णधार हरमनप्रीत थोडी नाराज दिसली. मात्र. पुढच्याच षटकात पेरी ( १३) धावांवर रन आऊट झाली. ७१ वर ५ वी विकेट पडली. 10 षटकांत RCBच्या 5 बाद 81 धावा झाल्या आहेत.

टॅग्स :महिला प्रीमिअर लीगमुंबई इंडियन्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरस्मृती मानधनाहरनमप्रीत कौर
Open in App