WPL 2023: सलग ५ सामने हरल्यानंतरही RCB फायनल गाठू शकते का? पाहा Playoff चं समीकरण

सलग ५ सामने जिंकून मुंबईने प्ले-ऑफमधले स्थान निश्चित केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 06:15 PM2023-03-15T18:15:04+5:302023-03-15T18:15:40+5:30

whatsapp join usJoin us
WPL 2023 playoff scenario can Smriti Mandhana led RCB qualify for final Mumbai Indians Final | WPL 2023: सलग ५ सामने हरल्यानंतरही RCB फायनल गाठू शकते का? पाहा Playoff चं समीकरण

WPL 2023: सलग ५ सामने हरल्यानंतरही RCB फायनल गाठू शकते का? पाहा Playoff चं समीकरण

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Smriti Mandhana RCB, WPL 2023: महिला प्रीमियर लीग स्पर्धेचे यंदा पहिले वर्ष आहे. या स्पर्धेची प्ले-ऑफ सामन्यांकडे वाटचाल सुरू आहे. गुजरात जायंट्सचा (GG) पराभव करून, मुंबई इंडियन्स (MI)ने या मोसमातील सलग पाचवा विजय नोंदवला. यासह त्यांनी प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. आता उर्वरित संघांचे काय होणार आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) अजूनही प्लेऑफमध्ये पोहोचू शकेल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

महिला प्रीमियर लीगमध्ये एकूण पाच संघ आहेत. त्यापैकी पॉइंट टेबलमधील अव्वल संघ थेट अंतिम फेरीत पोहोचेल. क्रमांक २ आणि क्रमांक ३ च्या संघांमध्ये एलिमिनेटर सामना असेल. तर हा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत पोहोचेल.

अंतिम फेरी गाठण्याचे समीकरण काय?

१४ मार्चपर्यंतची परिस्थिती पाहिल्यास मुंबई इंडियन्स १० गुणांसह अव्वल, तर दिल्ली कॅपिटल्स ८ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. म्हणजेच हे दोन्ही संघ आता थेट फायनलमध्ये जाण्याच्या शर्यतीत आहेत. WPL मध्ये प्रत्येक संघाला ८-८ सामने खेळावे लागतात, अशा परिस्थितीत जो संघ अव्वल असेल तो अंतिम फेरीत जाईल. जर आपण इतर संघांचे समीकरण पाहिले तर यूपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स पॉइंट टेबलमध्ये नंबर-3 आणि नंबर-4 वर आहेत, त्यामुळे या संघांना टॉप-2 मध्ये स्थान मिळवण्याची संधी आहे. पण पाच पैकी पाच पराभव पत्करलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी त्यांच्यासाठी अडचणी आहेत.

RCB पात्र ठरू शकेल का?

RCBचे अजून तीन सामने बाकी आहेत, जर ते तिन्ही सामने जिंकले तर त्यांचे एकूण ६ गुण होतील. मात्र तरीही त्याला इतर संघांच्या नशिबावर अवलंबून राहावे लागणार आहे. मुंबई आणि दिल्ली संघांनी त्यांचे उर्वरित सामने जिंकल्यास आरसीबीला फायदा होऊ शकतो. कारण अशा स्थितीत गुजरात-यूपीचा पराभव होईल आणि आरसीबीला पुढे जाण्याची संधी मिळेल.

Web Title: WPL 2023 playoff scenario can Smriti Mandhana led RCB qualify for final Mumbai Indians Final

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.