WPL 2023 : स्मृती मानधनाच्या RCB चे साखळीतच आव्हान संपुष्टात; यूपी वॉरियर्सने अडवली वाट

WPL 2023 : इंडियन प्रीमिअर लीगप्रमाणे महिला प्रीमिअर लीगमध्येही RCB च्या संघाच्या वाट्याला अपयशच आले...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 07:18 PM2023-03-20T19:18:02+5:302023-03-20T19:18:28+5:30

whatsapp join usJoin us
WPL 2023 : UP Warriorz qualify for the playoffs. RCB and Gujarat Giants are knocked out, Mumbai Indians, Delhi Capitals & UP Warriorz have qualified for the playoffs   | WPL 2023 : स्मृती मानधनाच्या RCB चे साखळीतच आव्हान संपुष्टात; यूपी वॉरियर्सने अडवली वाट

WPL 2023 : स्मृती मानधनाच्या RCB चे साखळीतच आव्हान संपुष्टात; यूपी वॉरियर्सने अडवली वाट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

WPL 2023 : इंडियन प्रीमिअर लीगप्रमाणे महिला प्रीमिअर लीगमध्येही RCB च्या संघाच्या वाट्याला अपयशच आले... स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या महिलांच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले. ७ सामन्यांत केवळ दोन विजय मिळवल्यानंतरही RCBला प्ले ऑफच्या आशा होत्या, परंतु त्यासाठी त्यांना इतर संघांवर अवलंबून रहावे लागले होते. त्याचाच फटका आज त्यांना बसला. यूपी वॉरियर्सने चुरशीच्या सामन्यात गुजरात जायंट्सवर विजय मिळवताना RCB व GG या दोघांनाही स्पर्धेबाहेर फेकले. सर्वात महागडी खेळाडू ठरलेल्या स्मृतीला सहा सामन्यांत ३५, २३, १८, ४, ८ व ० अशी कामगिरी करता आली आणि त्याचा संघाला फटका बसला.


गुजरात जायंट्सने आजचा सामना जिंकणे त्यांच्यासह RCB साठीही महत्त्वाचा होता. गुजरातने दयालन हेमलता ( ५७) आणि अॅश्ली गार्डनर ( ६०) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर ६ बाद १७८ धावा केल्या. प्रत्युत्तरात यूपी वॉरियर्सचे तीन फलंदाज ३९ धावांवर माघारी परतले. पण, ताहलिया मॅकग्राथ ( ५७) व ग्रेस हॅरिस ( ७२) यांनी दमदार खेळ करताना संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणले. त्यानंतर सोफी एस्लेस्टनने १३ चेंडूंत १९ धावा करताना संघाचा विजय पक्का केला. WPL मध्ये मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि यूपी वॉरियर्स यांनी प्ले ऑफमध्ये आपली जागा पक्की केली आहे. मुंबईने आणखी एक विजय मिळवल्यास ते थेट फायनलसाठी पात्र ठरतील.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: WPL 2023 : UP Warriorz qualify for the playoffs. RCB and Gujarat Giants are knocked out, Mumbai Indians, Delhi Capitals & UP Warriorz have qualified for the playoffs  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.