WPL 2024 Auction Live : ऑस्ट्रेलियाची सदरलँड दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात; २ कोटींचा वर्षाव, मुंबईची माघार

WPL Auction Live : आज मुंबईत महिला प्रीमिअर लीगच्या दुसऱ्या हंगामासाठी लिलाव पार पडत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2023 03:39 PM2023-12-09T15:39:16+5:302023-12-09T15:39:45+5:30

whatsapp join usJoin us
WPL 2024 Auction Live updates in marathi Delhi Capitals gets australia's Annabelle Sutherland for 2 crores INR | WPL 2024 Auction Live : ऑस्ट्रेलियाची सदरलँड दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात; २ कोटींचा वर्षाव, मुंबईची माघार

WPL 2024 Auction Live : ऑस्ट्रेलियाची सदरलँड दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात; २ कोटींचा वर्षाव, मुंबईची माघार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

wpl auction live updates in marathi : आज महिला प्रीमिअर लीगचा लिलाव होत असून दिल्ली कॅपिटल्सच्या फ्रँचायझीने २ कोटी खर्चून स्टार ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडूला आपल्या संघाचा भाग बनवले. आयपीएलच्या धरतीवर सुरू झालेली महिला प्रीमिअर लीग आपल्या दुसऱ्या हंगामाकडे कूच करत आहे. आज मुंबईत महिला प्रीमिअर लीगच्या दुसऱ्या हंगामासाठी लिलाव पार पडत आहे. यावेळी एकूण १६५ खेळाडूंनी WPL २०२४ च्या लिलावासाठी नोंदणी केली आहे. यामध्ये १०४ भारतीय आणि ६१ परदेशी खेळाडू आहेत. १६५ क्रिकेटपटूंपैकी १५ खेळाडू सहयोगी देशांचे आहेत, तर कॅप्ड खेळाडूंची एकूण संख्या ५६ आणि अनकॅप्ड खेळाडू १०९ आहेत. पाच संघांकडे जास्तीत जास्त ३० स्लॉट उपलब्ध आहेत, त्यापैकी ९ जागा परदेशी खेळाडूंसाठी आहेत.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या ॲनाबेल सदरलँडला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात चांगलीच चढाओढ झाली. दोन्हीही संघ पदार्पणाच्या हंगामातील फायनलिस्ट आहेत. मात्र, इथे मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीने हार मानली अन् अष्टपैलू खेळाडूला आपल्या ताफ्यात घेण्यात दिल्ली कॅपिटल्सला यश आले. अष्टपैलू ॲनाबेल सदरलँडची मूळ किंमत ४० लाख रूपये होती, जिला दिल्ली कॅपिटल्सने २ कोटी रुपयांत खरेदी केली. सदरलँडला विकत घेण्यासाठी दिल्ली आणि मुंबई यांच्यात स्पर्धा होती, पण दिल्लीने बाजी मारली.

Web Title: WPL 2024 Auction Live updates in marathi Delhi Capitals gets australia's Annabelle Sutherland for 2 crores INR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.