wpl auction live updates in marathi । मुंबई : मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीने मोजकेच पण चांगले खेळाडू आपल्या ताफ्यात घेण्यावर भर दिला. दक्षिण आफ्रिकेची स्टार खेळाडू शबनीम इस्माइलला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात चढाओढ झाली. त्यानंतर गुजरात जायंट्सच्या फ्रँचायझीने यात उडी घेत आफ्रिकन खेळाडूला आपल्या ताफ्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुंबई इंडियन्सने बाजी मारत १.२० कोटी रूपयांत शबनीमला आपल्या संघाचा भाग बनवले. दक्षिण आफ्रिकेची वेगवान गोलंदाज शबनीम इस्माईल, जिची मूळ किंमत ४० लाख रुपये होती. तिला मुंबई इंडियन्सने १ कोटी २० लाख रुपयांना विकत घेतले.
आयपीएलच्या धरतीवर सुरू झालेली महिला प्रीमिअर लीग आपल्या दुसऱ्या हंगामाकडे कूच करत आहे. आज मुंबईत महिला प्रीमिअर लीगच्या दुसऱ्या हंगामासाठी लिलाव पार पडत आहे. यावेळी एकूण १६५ खेळाडूंनी WPL २०२४ च्या लिलावासाठी नोंदणी केली आहे. यामध्ये १०४ भारतीय आणि ६१ परदेशी खेळाडू आहेत. १६५ क्रिकेटपटूंपैकी १५ खेळाडू सहयोगी देशांचे आहेत, तर कॅप्ड खेळाडूंची एकूण संख्या ५६ आणि अनकॅप्ड खेळाडू १०९ आहेत. पाच संघांकडे जास्तीत जास्त ३० स्लॉट उपलब्ध आहेत, त्यापैकी ९ जागा परदेशी खेळाडूंसाठी आहेत.
यंदाच्या लिलावातील टॉप-५ महागडे खेळाडू
- काशवी गौतम (भारत) - २ कोटी
- ॲनाबेल सदरलँड (ऑस्ट्रेलिया) - २ कोटी
- वृंदा दिनेश (भारत) - १.३० कोटी
- शबनीम इस्माइल (दक्षिण आफ्रिका) - १ कोटी २० लाख
- फोबी लिचफील्ड (ऑस्ट्रेलिया) - १ कोटी