WPL 2024, RCB vs UPW ( Marathi News ) : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने महिला प्रीमिअर लीग २०२४ मध्ये सोमवारी यूपी वॉरियर्स संघावर २३ धावांनी विजय मिळवला. RCB ने प्रथम फलंदाजी करताना ३ बाद १९८ धावांचा डोंगर उभा केला, परंतु UPW ला ८ बाद १७५ धावाच करता आल्या. कर्णधार स्मृती मानधना व एलिसे पेरी ( ELLYSE PERRY ) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर RCB ने या धावा उभ्या केल्या. UPW कडून कर्णधार ॲलिसा हिली ( ५५), दीप्ती शर्मा ( ३३) व पूनम खेमनार ( ३१) यांनी संघर्ष केला. पण, या सामन्यात ३७ चेंडूंत ५८ धावा कुटणाऱ्या एलिसे पेरीने हवा केली. मॅन ऑफ द सीरीज पुरस्कार मिळालेल्या एलिस पेरीच्या बॅटमधून एक असा खणखणीत षटकार आला की TATA कंपनीला फटका बसला...
यूपी वॉरियर्सची कर्णधार ॲलिसा हिलीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. स्मृती मानधना आणि सबिनेनी मेघना ( २८) यांच्यात सलामीच्या विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी झाली. मानधनाने ५० चेंडूत १० चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ८० धावा केल्या. पण खरा चमत्कार ऋचा घोषने केला, जिन १० चेंडूत २ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने नाबाद २१ धावा केल्या. पेरीने आपल्या खेळीत ४ चौकार आणि ४ षटकार मारले.
एक क्षण असा आला जेव्हा पेरीचा तिने मारलेल्या षटकारावर विश्वास बसला नाही. तिने १९व्या षटकात दीप्ती शर्माच्या चेंडूवर इतका दमदार षटकार मारला की तो थेट सीमारेषेच्या बाहेर ठेवलेल्या टाटा ईव्ही पंचच्या काचेवर आदळला. हा चेंडू इतका जोरदार होती की कारच्या काचा फुटल्या आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.