महिला प्रीमिअर लीग २०२४ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने सलग दोन विजयाची नोंद केली. मागील पर्वात RCB च्या महिला संघाला फक्त दोन विजयावर समाधान मानावे लागले होते. पण, यंदा त्यांनी सलग दोन विजय मिळूवन तालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. चिन्नास्वामी स्टेडियमवर काल झालेल्या लढतीत त्यांनी गुजरात जायंट्सवर विजय मिळवला. या सामन्यात RCB ची क्रिकेटपटू श्रेयांका पाटील ( Shreyanka Patil) हिला चाहत्याने चक्क लग्नाची मागणी घेतली.
RCB च्या डावातील सातव्या षटकात कॅमेरामनने जेव्हा कॅमेरा चाहत्यांकडे वळवला, तेव्हा एक चाहता हातात पोस्टर घेऊन उभा दिसला आणि त्यावर श्रेयांका पाटील माझ्याशी लग्न करशील का, असे लिहिले होते. हा पोस्टर पाहून डग आऊटमध्ये बसलेल्या RCBच्या खेळाडूंना हसू आवरले नाही. बंगळुरूने ८ विकेट्सने हा सामना जिंकला. स्मृती मानधना आमि शबिनेनी मेघना यांच्या दमदार खेळीने हा विजय मिळवला. १०८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना स्मृतीने ४३ धावा केल्या. मेघनाने ३६ धावांची खेळी केली आणि एलिसे पेरी नाबाद २३ धावा केल्या. बंगळुरूने १२.३ षटकांत हे लक्ष्य पार केले.
कोण आहे श्रेयांका पाटील?
आजच्या सामन्यातून श्रेयांका पाटीलने भारतीय संघात पदार्पण केले आहे. श्रेयांका पाटील ही बंगळुरूची रहिवासी असून वयाच्या ८ व्या वर्षापासून तिने क्रिकेट खेळायला सुरूवात केली. श्रेयांका टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीला क्रिकेटमधला तिचा आदर्श मानते. याशिवाय श्रेयांका आयपीएलच्या पहिल्या सत्रापासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला चीअर करत आली आहे.
Web Title: WPL 2024 : Marriage proposal for Shreyanka Patil and RCB’s players laughing in the dressing room.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.