WPL 2025 : स्मृतीच्या तोऱ्यामुळं हरमनप्रीत फसली! फॉरेनर कॅप्टन 'ड्रायव्हिंग सीट'वर जाऊन बसली, आता...

मुंबई इंडियन्सनं गमावली थेट फायनलमध्ये एन्ट्री मारण्याची संधी, आता एलिमिनेटरमध्ये दाखवावी लागेल ताकद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 10:52 IST2025-03-12T10:37:29+5:302025-03-12T10:52:30+5:30

whatsapp join usJoin us
WPL 2025 Playoffs are confirmed Smriti Mandhana RCB Beat Harmanpreet Kaur MI Now Mumbai Indians Women vs Gujarat Giants Women Eliminator Delhi Capitals Makes Third Final | WPL 2025 : स्मृतीच्या तोऱ्यामुळं हरमनप्रीत फसली! फॉरेनर कॅप्टन 'ड्रायव्हिंग सीट'वर जाऊन बसली, आता...

WPL 2025 : स्मृतीच्या तोऱ्यामुळं हरमनप्रीत फसली! फॉरेनर कॅप्टन 'ड्रायव्हिंग सीट'वर जाऊन बसली, आता...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

WPL Playoffs List Final : स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघानं महिला प्रीमियर लीगच्या अखेरच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभूत करत यंदाच्या हंगामाचा शेवट गोड केला. या सामन्यात कॅप्टन  स्मृती मानधनाच्या भात्यातून अर्धशतकही पाहायला मिळाले. अखेरच्या टप्प्यात तिने दाखवलेल्या तोऱ्यामुळे हरमनप्रीत कौर चांगलीच फसली. कारण हा सामना जिंकून मुंबई इंडियन्सच्या संघाला थेट फायनल खेळण्याची संधी होती. साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यातील पराभवामुळे MI मागे पडली अन् ही संधी साधत  ग्रुप टॉपर ठरलेली दिल्ली कॅपिटल्स संघाची कॅप्टन मेग लेनिंग (Meg Lanning ) ड्रायविंग सीटवर जाऊन बसली.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 
 

दिल्ली कॅपिटल्स अन् मुंबई इंडियन्समध्ये टॉपरसाठी होती रंगत 

महिला प्रीमियर लीगच्या तिसऱ्या हंगामात सहभागी पाच संघापैकी आरसीबी आणि यूपी वॉरियर्स हे दोन संघ आधीच प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स आणि गुजरात हे तीन संघ प्ले ऑफसाठी  पात्र ठरले. या तीन संघातील मुंबई इंडियन्स आणि दिल्ली यांच्यात ग्रुपमध्ये टॉप करून थेट फायनल खेळण्याची शर्यत होती. दोन्ही संघांनी साखळी फेरीतील ८ सामन्यातील ५ विजयासह प्रत्येकी १०-१० गुण आपल्या खात्यात जमा केले. पण उत्तम धावगतीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्स संघानं थेट फायनल गाठली. RCB विरुद्धचा सामना जिंकून मुंबई इंडियन्सला १२ गुणांसह ग्रुप टॉप करण्याची संधी होती. पण स्मृतीच्या संघानं हरमनप्रीतला ते ते साध्य करु दिले नाही. 

आता फायनल गाठण्यासाठी मुंबई इंडियन्सला एलिमिनेटरमध्ये गुजरातला द्यावी लागेल मात

आरसबी विरुद्धच्या लढतीतील पराभवामुळे आता फायनल गाठण्यासाठी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सला एलिमिनेटर लढतीत गुजरात जाएंट्स संघाला मात द्यावी लागेल. १३ मार्चला हे दोन संघ मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर एलिमिनेटरमध्ये एकमेकांना भिडतील.

मुंबईतच रंगणार फायनल!

महिला प्रीमियर लीगमधील अंतिम सामना देखील मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवरच खेळवण्यात येणार आहे. मुंबई इंडियन्स आणि गुजरात जाएंट्स यांच्यातील विजेता १५ मार्चला दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध जेतेपदासाठी मैदानात उतरेल. पहिल्या हंगामात मुंबई इंडियन्सच्या संघानं जेतेपद मिळवलं होते. तर दुसऱ्या हंगामात आरसीबीनं बाजी मारली होती. तिसऱ्या हंगामात नवा विजेता मिळणार की, मुंबई इंडियन्स दुसऱ्यांदा ट्रॉफी उंचवणार ते पाहण्याजोगे असेल.
 

Web Title: WPL 2025 Playoffs are confirmed Smriti Mandhana RCB Beat Harmanpreet Kaur MI Now Mumbai Indians Women vs Gujarat Giants Women Eliminator Delhi Capitals Makes Third Final

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.