WPL 2025 : स्मृतीच्या चॅम्पियन RCB ची पराभवाची हॅटट्रिक! हरमनप्रीतची MI झाली टॉपर

एक नजर टाकुयात आरसीबी वर्सेस जीजी यांच्यातील लढतीनंतर WPL च्या गुणतालिकेत कोण कोणत्या क्रमांवर आहे यावर.....

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 11:18 IST2025-02-28T11:12:40+5:302025-02-28T11:18:39+5:30

whatsapp join usJoin us
WPL 2025 Points Table After RCB W vs GG W 12th Match Mumbai Indians And Delhi Capitals In Top 2 | WPL 2025 : स्मृतीच्या चॅम्पियन RCB ची पराभवाची हॅटट्रिक! हरमनप्रीतची MI झाली टॉपर

WPL 2025 : स्मृतीच्या चॅम्पियन RCB ची पराभवाची हॅटट्रिक! हरमनप्रीतची MI झाली टॉपर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

WPL 2025 Smriti Mandhana RCB Loss Against GG, Harmanpreet Kaur MI Top In Points Table : स्मृती मानधनाच्या  नेतृत्वाखालील गत चॅम्पियन्स रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघानं यंदाच्या महिला प्रीमिअर लीगच्या तिसऱ्या हंगामाची अगदी धमाक्यात सुरुवात केली. पण सलग दोन सामने जिंकल्यावर स्मृतीच्या ताफ्याची गाडी पटरीवरुन घसरलीये. सलग तीन पराभवाची नामुष्की या संघावर ओढावलीये. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

स्मृती मानधनाचा संघ कोमात अन् कॅप्टन हरमनप्रीत कौरचा संघ जोमात 

२७ फेब्रुवारीला गुजरात जाएंट्स विरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर आता पॉइंट्स टेबलमध्ये एका बाजूला भारतीय महिला संघाची उप कॅप्टन स्मृती मानधनाचा संघ कोमात अन् कॅप्टन हरमनप्रीत कौरचा संघ जोमात असा सीन पाहायला मिळत आहे. एक नजर टाकुयात आरसीबी वर्सेस जीजी यांच्यातील लढतीनंतर WPL च्या गुणतालिकेत कोण कोणत्या क्रमांवर आहे यावर.....

मुंबई इंडियन्सचा संघ टॉपला

यंदाच्या हंगामातील सलग तिसऱ्या पराभवानंतर आरसीबीचा संघ महिला प्रीमिअर लीगच्या गुणतालिकेत (WPL 2025 Points Table) तिसऱ्या स्थानावर आहे. ५ पैकी २ सामन्यातील विजयासह त्यांच्या खात्यात ४ गुण जमा आहेत. या संघाचे नेट रन रेट +०.१५५ इतके आहे. दुसरीकडे मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सचा संघ आघाडीवर असल्याचे दिसते. या दोन्ही संघांनी ४ सामन्यातील ३ विजयसाह आपल्या खात्यात प्रत्येकी ६-६ गुण जमा केले आहेत. नेट रन रेटच्या जोरावर मुंबई इंडियन्स महिला संघ टॉपला दिसतोय.. 

WPL 2025 गुणतालिकेत कोणता संघ कोणत्या क्रमांकावर?

  • मुंबई इंडियन्स  ४ पैकी ३ विजय अन् १ पराभव (६ गुण) नेट रनरेट ०.७८
  • दिल्ली कॅपिटल्स  ४ पैकी ३ विजय अन् १ पराभव (६ गुण) नेट रनरेट -०.२२३
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु  ४ पैकी ३ विजय अन् १ पराभव (४ गुण) नेट रनरेट ०.१५५
  • यूपी वॉरियर्ज  ५ पैकी २ विजय अन् २ पराभव (४ गुण) नेट रनरेट -०.१२४
  • गुजरात जाएंट्स  ५ पैकी २ विजय अन् ३ पराभव (६ गुण) नेट रनरेट -०.४५

Web Title: WPL 2025 Points Table After RCB W vs GG W 12th Match Mumbai Indians And Delhi Capitals In Top 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.