WPL Auction 2023 Live : मुंबई इंडियन्सकडून आणखी एक मोठी खेळाडू निसटली; अंबानी माय-लेकामध्ये चर्चा रंगली, दिसले टेंशनमध्ये

Women’s Premier League 2023 auction Live : पहिल्या वहिल्या महिला प्रीमिअर लीग २०२३ साठी आज मुंबईत लिलाव प्रक्रिया पार पडत आहे आणि पहिल्या सेटमध्ये भारताच्या स्मृती मानधनाने ( Smriti Mandhana) सर्वाधिक ३.४० कोटी रुपये घेतले. मुंबई

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 03:25 PM2023-02-13T15:25:10+5:302023-02-13T15:26:00+5:30

whatsapp join usJoin us
WPL Auction 2023 Live : Deepti Sharma goes to UP Warriorz for 2.6 crore, Mumbai raise it to INR 2.4 crore | WPL Auction 2023 Live : मुंबई इंडियन्सकडून आणखी एक मोठी खेळाडू निसटली; अंबानी माय-लेकामध्ये चर्चा रंगली, दिसले टेंशनमध्ये

WPL Auction 2023 Live : मुंबई इंडियन्सकडून आणखी एक मोठी खेळाडू निसटली; अंबानी माय-लेकामध्ये चर्चा रंगली, दिसले टेंशनमध्ये

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Women’s Premier League 2023 auction Live : पहिल्या वहिल्या महिला प्रीमिअर लीग २०२३ साठी आज मुंबईत लिलाव प्रक्रिया पार पडत आहे आणि पहिल्या सेटमध्ये भारताच्या स्मृती मानधनाने ( Smriti Mandhana) सर्वाधिक ३.४० कोटी रुपये घेतले. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात RCB ने बाजी मारली. अॅशली गार्डनर ( ऑस्ट्रेलिया) साठी गुजरात जायंट्सने ३.२ कोटी रुपये मोजले.  

१.८० कोटींत हरमनप्रीत कौर Mumbai Indiansच्या ताफ्यात, गुजरात जायंट्सने ऑसी खेळाडूसाठी ३.२० कोटी मोजले


स्मृती मानधनाचे पहिले नाव येताच मुंबई इंडियन्सच्या निता अंबानी यांनी पॅडल उचलला. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांनी बोली लावण्यास सुरुवात  केली. २.६० कोटी पर्यंत दोन्ही फ्रँचायझींमध्ये चुरस रंगली. स्मृतीने ११२ ट्वेंटी-२० सामन्यांत ११२च्या स्ट्राईक रेटने २६५१ धावा केल्या आहेत. RCB ने ३.४० कोटींत तिला आपल्या ताफ्यात घेतले. अॅशली गार्डनर ( ऑस्ट्रेलिया) साठी गुजरात जायंट्सने ३.२ कोटी रुपये मोजले.  एलिसे पेरीला १.७० कोटींत RCB ने आपल्या ताफ्यात घेतले.  RCB ने आणखी एक स्टार खेळाडू सोफी डिव्हाईनला मुळ किंमत ५० लाखात आपल्या संघात सहभागी करून घेतले. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्यासाठी मोठी बोली लागली जाईल अशी अपेक्षा होती. RCB आणि दिल्ली कॅपिटल्स यांनी एक कोटीपर्यंत  तिच्यासाठी बोली लावली. पण, १.१० कोटी होताच मुंबई इंडियन्सने एन्ट्री घेतली. मुंबईने १.८० कोटींत तिला आपल्या संघात घेतले.  
 
भारताची अष्टैपलू दीप्ती शर्मा हिच्यासाठी गुजरात जायंट्स व दिल्ली कॅपिटल्स यांच्यात  चुरस रंगली. तिने ८७ सामन्यांत ९६ विकेट्स घेतल्या आहेत. १.६० लाखांनंतर मुंबई इंडियन्स ने यात उडी घेतली. २ कोटी किंमत होताच दिल्लीने माघार घेतली आणि त्यानंतर यूपी वॉरियर्सची एन्ट्री झाली. २.४० कोटीपर्यंत मुंबईने बोली लावली, परंतु २.६० कोटी मोजून यूपी वॉरियर्सने तिला आपल्या ताफ्यात घेतले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

 

Web Title: WPL Auction 2023 Live : Deepti Sharma goes to UP Warriorz for 2.6 crore, Mumbai raise it to INR 2.4 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.