Women’s Premier League 2023 auction Live : पहिल्या वहिल्या महिला प्रीमिअर लीग २०२३ साठी आज मुंबईत लिलाव प्रक्रिया पार पडत आहे. महिला प्रीमिअर लीगमध्ये मुंबई इंडियन्सने ९१२ कोटींत मुंबई, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ९०१ कोटींत बंगळुरू, कॅप्री ग्लोबलने ७५७ कोटींत कोलकाता आणि JSW ग्रुपने ८१० कोटींत बंगळुरूचे हक्क जिंकले आहेत. गुजरात जायंट्स, यूपी वॉरियर्स, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स अशी संघांची नावं ठरवली गेली आहेत.
स्मृती मानधना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळणार; मुंबई इंडियन्सच्या प्रयत्नांना अपयश
पहिल्या सेटमध्ये सोफी डिव्हाईन ( न्यूझीलंड-, सोफी एक्लेस्टन ( इंग्लंड), अॅशली गार्डनर ( ऑस्ट्रेलिया), हरमनप्रीत कौर व स्मृती मानधना ( भारत), हॅली मॅथ्यू ( वेस्ट इंडिज), एलिसे पेरी ( ऑस्ट्रेलिया) यांच्यावर बोली लागणार आहे. इंडियन प्रीमिअर लीगच्या २००८च्या पहिल्या लिलावात ९.५ कोटींसह महेंद्रसिंग धोनी सर्वात महागडा खेळाडू ठरला होता.
महिला प्रीमिअर लीगमध्ये हा मान कोण पटकावतोय याची उत्सुकता आहे. स्मृती मानधनाचे पहिले नाव येताच मुंबई इंडियन्सच्या निता अंबानी यांनी पॅडल उचलला. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांनी बोली लावण्यास सुरुवात केली. २.६० कोटी पर्यंत दोन्ही फ्रँचायझींमध्ये चुरस रंगली. स्मृतीने ११२ ट्वेंटी-२० सामन्यांत ११२च्या स्ट्राईक रेटने २६५१ धावा केल्या आहेत. RCB ने ३.४० कोटींत तिला आपल्या ताफ्यात घेतले.