Women’s Premier League 2023 auction Live : पहिल्या वहिल्या महिला प्रीमिअर लीग २०२३ साठी आज मुंबईत लिलाव प्रक्रिया पार पडत आहे आणि पहिल्या सेटमध्ये भारताच्या स्मृती मानधनाने ( Smriti Mandhana) सर्वाधिक ३.४० कोटी रुपये घेतले. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात RCB ने बाजी मारली. अॅशली गार्डनर ( ऑस्ट्रेलिया) साठी गुजरात जायंट्सने ३.२ कोटी रुपये मोजले. पण, त्यानंतर मुंबई इंडियन्सने चांगले खेळाडू आपल्या ताफ्यात घेतले. जेमिमा रॉड्रीग्जसाठी त्यांनी प्रयत्न केला खरा, परंतु त्यांना अपयश आले. पण, त्याची भरपाई त्यांनी 'छोटा पांड्या' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय खेळाडूला आपल्या ताफ्यात घेऊन केली.
"आम्ही देखील 'तेच' करण्याचा प्रयत्न करू", मुंबईने खरेदी करताच हरमनप्रीतचं मोठं विधान
महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात अर्धशतकी खेळी करून पाकिस्तानला पराभवाचा धक्का देणाऱ्या जेमिमा रॉड्रिग्जसाठी मुंबई इंडियन्सचे प्रयत्न कमी पडले. ५० लाख मुळ किंमत असलेल्या खेळाडूंमध्ये जेमिमाचे नाव होते आणि दिल्ली कॅपिटल्सने पहिली बोली लावली. यूपी वॉरियर्सने १.५ कोटीपंर्यंत बोली लावून दिल्लीला तगडी टक्कर दिली होती. त्यानंतर १.६० कोटी बोली लावून मुंबईने एन्ट्री घेतली. किंमत दोन कोटींच्या वर जाताच मुंबईने माघार घेतली आणि दिल्ली कॅपिटल्सने २.२० कोटींत तिला आपल्या ताफ्यात घेतले.
मुंबई इंडियन्सने डावखुरी फलंदाज यास्तिका भाटीयासाठी १.५० कोटी रुपये मोजले. मधल्या फळीतील या फलंदाजाला घेण्यासाठी गुजरात जायंट्स व यूपी वॉरियर्स यांनी जोर लावला होता. पण, मुंबईने बाजी मारली. भारतीय महिला संघात छोटा पांड्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पूजा वस्त्राकरला ( India allrounder Pooja Vastrakar) मुंबई इंडियन्सने आपल्या संघात घेतले. तिच्यासाठी १.९० कोटी रुपये मोजले गेले
पूजा मूळची मध्य प्रदेशच्या शाहडोल येथील असून तिचा जन्म २५ सप्टेंबर १९९९ मधला आहे. तिचे वडिल बंधनराम वस्राकर BSNL चे निवृत्त कर्मचारी आहेत. अवघ्या १० वर्षांची असताना पूजाच्या आईचे निधन झाले. पूजा घरातील सर्वात लहान असून तिला चार बहिणी आणि २ भाऊ आहेत. तिच्या बॉयकटमुळे मुलांसारखी दिसणारी पूजा खेळाच्या बाबतीतही तितकीच आक्रमक असल्याचे मैदानावर दिसून येते.
- अॅशली गार्डनर ( ऑस्ट्रेलिया) साठी गुजरात जायंट्सने ३.२ कोटी रुपये मोजले.
- एलिसे पेरीला १.७० कोटींत RCB ने आपल्या ताफ्यात घेतले.
- RCB ने आणखी एक स्टार खेळाडू सोफी डिव्हाईनला मुळ किंमत ५० लाखात आपल्या संघात सहभागी करून घेतले.
- भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर १.८० कोटींत मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात
- भारताची अष्टैपलू दीप्ती शर्मा २.६० कोटींत यूपी वॉरियर्सकडे
- भारताची जलदगती गोलंदाज रेणुका सिंगसाठी RCB ने १.५ कोटी मोजले.
- इंग्लंडच्या नॅट शीव्हर-ब्रंटसाठी मुंबई इंडियन्सने मोजले ३.२ कोटी
- ऑस्ट्रेलियन ऑलराऊंडर ताहलिया मॅकग्राथ १.४ कोटींत यूपी वॉरियर्सच्या ताफ्यात
- बेथ मुनीसाठी गुजरात जायट्सन २ कोटी मोजले
- दक्षिण आफ्रिकेची गोलंदाज शबनिम इस्मैल यूपी वॉरियर्सच्या ताफ्यात १ कोटींत
- एमेलिया केरसाठी मुंबई इंडियन्सने मोजले १ कोटी
- सोफिया डंकली ६० लाखांत गुजरात जायंट्सच्या ताफ्यात
- मेग लॅनिंग दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात १.१ कोटींत
- शेफाली वर्मासाठी दिल्ली कॅपिटल्सने २.२ कोटी मोजले
- अॅनाबेल सदरलँड ७० लाखांत गुजरात जायंट्सच्या ताफ्यात
- हर्लीन देओल ४० लाखांच्या मुळ किमतीत गुजरात जायंट्सकडे
- गुजरात जायंट्सने डिएंड्रा डॉटिनसाठी मोजले ६० लाख
- भारताची यष्टिरक्षक-फलंदाज रिचा घोष १.९ कोटींत RCB च्या ताफ्यात
- एलिसा हिली यूपी वॉरियर्सकडून खेळणार ७० लाखांत डिल
- अंजली सर्वनी ५५ लाखांत यूपी वॉरियर्सच्या संघात
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"