Join us  

WPL Auction 2023 Live : पाकिस्तानची जीरवणाऱ्या जेमिमा रॉड्रीग्जसाठी Mumbai Indiansचे प्रयत्न कमी पडले, दिल्लीने मोजली तगडी रक्कम 

Women’s Premier League 2023 auction Live : मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात RCB ने बाजी मारली. अॅशली गार्डनर ( ऑस्ट्रेलिया) साठी गुजरात जायंट्सने ३.२ कोटी रुपये मोजले.   

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 4:29 PM

Open in App

Women’s Premier League 2023 auction Live : पहिल्या वहिल्या महिला प्रीमिअर लीग २०२३ साठी आज मुंबईत लिलाव प्रक्रिया पार पडत आहे आणि पहिल्या सेटमध्ये भारताच्या स्मृती मानधनाने ( Smriti Mandhana) सर्वाधिक ३.४० कोटी रुपये घेतले. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात RCB ने बाजी मारली. अॅशली गार्डनर ( ऑस्ट्रेलिया) साठी गुजरात जायंट्सने ३.२ कोटी रुपये मोजले.  

स्मृतीसाठी मोठी बोली लागताच माघार, त्याच Mumbai Indians ने इंग्लंडच्या खेळाडूवर कोट्यवधींचा वर्षाव 

  • ऑस्ट्रेलियन ऑलराऊंडर ताहलिया मॅकग्राथ १.४ कोटींत यूपी वॉरियर्सच्या ताफ्यात
  • बेथ मुनीसाठी गुजरात जायट्सन २ कोटी मोजले  
  • दक्षिण आफ्रिकेची गोलंदाज शबनिम इस्मैल यूपी वॉरियर्सच्या ताफ्यात १ कोटींत  
  • एमेलिया केरसाठी मुंबई इंडियन्सने मोजले १ कोटी  
  • सोफिया डंकली ६० लाखांत गुजरात जायंट्सच्या ताफ्यात 
  • मेग लॅनिंग दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात १.१ कोटींत
  • शेफाली वर्मासाठी दिल्ली कॅपिटल्सने २.२ कोटी मोजले

 

महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात अर्धशतकी खेळी करून पाकिस्तानला पराभवाचा धक्का देणाऱ्या जेमिमा रॉड्रिग्जसाठी मुंबई इंडियन्सचे प्रयत्न कमी पडले. ५० लाख मुळ किंमत असलेल्या खेळाडूंमध्ये जेमिमाचे नाव होते आणि दिल्ली कॅपिटल्सने पहिली बोली लावली. यूपी वॉरियर्सने १.५ कोटीपंर्यंत बोली लावून दिल्लीला तगडी टक्कर दिली होती. त्यानंतर १.६० कोटी बोली लावून मुंबईने एन्ट्री घेतली. किंमत दोन कोटींच्या वर जाताच मुंबईने माघार घेतली आणि दिल्ली कॅपिटल्सने २.२० कोटींत तिला आपल्या ताफ्यात घेतले.  

स्मृती मानधनाचे पहिले नाव येताच मुंबई इंडियन्सच्या निता अंबानी यांनी पॅडल उचलला. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांनी बोली लावण्यास सुरुवात  केली. २.६० कोटी पर्यंत दोन्ही फ्रँचायझींमध्ये चुरस रंगली. स्मृतीने ११२ ट्वेंटी-२० सामन्यांत ११२च्या स्ट्राईक रेटने २६५१ धावा केल्या आहेत. RCB ने ३.४० कोटींत तिला आपल्या ताफ्यात घेतले. अॅशली गार्डनर ( ऑस्ट्रेलिया) साठी गुजरात जायंट्सने ३.२ कोटी रुपये मोजले. एलिसे पेरीला १.७० कोटींत RCB ने आपल्या ताफ्यात घेतले.  RCB ने आणखी एक स्टार खेळाडू सोफी डिव्हाईनला मुळ किंमत ५० लाखात आपल्या संघात सहभागी करून घेतले. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर १.८० कोटींत मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातभारताची अष्टैपलू दीप्ती शर्मा २.६० कोटींत यूपी वॉरियर्सकडे भारताची जलदगती गोलंदाज रेणुका सिंगसाठी RCB ने १.५ कोटी मोजले. 

इंग्लंडच्या खेळाडूसाठी कोट्यवधींचा वर्षाव इंग्लंडच्या नॅट शीव्हर-ब्रंटचे नाव येताच मुंबई इंडियन्सने पहिला पॅडल उचलला.  दिल्ली कॅपिटल्स व मुंबई यांच्यात १.६ कोटींपर्यंत चुरस रंगली. या किमतीत मुंबई इंग्लंडच्या ऑल राऊंडरला आपल्या ताफ्यात घेतील असे वाटत असताना यूपी वॉरियर्स शर्यतीत उतरले. त्यांनी ३ कोटींपर्यंत मुंबईला टफ दिली, परंतु मुंबईला ३.२ कोटींत  इंग्लंडच्या खेळाडूला आपल्या ताफ्यात घेण्यात यश मिळाले. शीव्हर-ब्रंटने १०४ ट्वेंटी-२०त १९९९ धावा केल्या आहेत आणि ७८ विकेट्स घेतल्या आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :महिला प्रीमिअर लीगमुंबई इंडियन्सदिल्ली कॅपिटल्स
Open in App