Join us  

WPL Auction 2023 Live : मुंबई इंडियन्स, यूपी वॉरियर्स, दिल्ली अन् गुजरात यांच्यावर RCB चा संघ पडतोय भारी; जाणून घ्या पाचही संघांची लिस्ट  

Women’s Premier League 2023 auction Live : पहिल्या वहिल्या महिला प्रीमिअर लीग २०२३ मध्ये स्मृती मानधनाचे नाणे खणखणीत वाजले.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 9:10 PM

Open in App

Women’s Premier League 2023 auction Live : पहिल्या वहिल्या महिला प्रीमिअर लीग २०२३ मध्ये स्मृती मानधनाचे नाणे खणखणीत वाजले. भारताच्या स्मृती मानधनाने ( Smriti Mandhana) सर्वाधिक ३.४० कोटींची बोली लागली आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ( RCB) तिला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले.  अॅशली गार्डनर ( ऑस्ट्रेलिया) साठी गुजरात जायंट्सने ३.२ कोटी रुपये मोजले. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे. आज ४०९ खेळाडूंपैकी ९० जणींवर यशस्वी बोली लागली. काही दिग्गज नावं अनसोल्ड राहिल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. 

WPL Auction 2023 Live : स्मृती मानधना ठरली 'स्टार'; टॉप टेन महागड्या खेळाडूंत भारतीयांचा दबदबा

महिला प्रीमिअर लीगमध्येमुंबई इंडियन्सने ९१२ कोटींत मुंबई, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ९०१ कोटींत बंगळुरू, कॅप्री ग्लोबलने ७५७ कोटींत कोलकाता  आणि JSW ग्रुपने ८१० कोटींत बंगळुरूचे हक्क जिंकले आहेत. गुजरात जायंट्स, यूपी वॉरियर्स, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स अशी संघांची नावं ठरवली गेली आहेत. 

  • दिल्ली कॅपिलट्सचा संघ - ( Delhi team for WIPL) - मेग लॅनिंग, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, लॉरा हॅरीस, जेसिया अख्तर, मॅरिझन्ने कॅप, शिखा पांडे, राधा यादव, मिन्नू मनी, तितास साधू, तारा नॉरिस, एलिसे कॅप्स, जेस जॉनासेन, स्नेह दीप्ती, अरुंधती रेड्डी, अपर्णा मोंडला, पूनम यादव, तानिया भाटीया

 

  • यूपी वॉरियर्स संघ ( UP Warriorz team for WPL) - दीप्ती शर्मा, एस यशश्री, सोफी एक्लेस्टन, लक्ष्मी यादव, ताहलिया मॅग्राथ, देविका वैद्य, शबनिम इस्मैल, ग्रेस हॅरीस, एलिसा हिली, लॉरेन बेल, अंजली सर्वणी, किरण नवगिरे, राजेश्वरी गायकवाड, सिमरन शेख, पार्शवी चोप्रा.

  • गुजरात जायंट्स ( Gujarat Giants Team For WPL ) - अॅश्ली गार्डनर, बेथ मुनी, दयालन हेमलथा, मानसी जोशी, अॅनाबेल सदरलँड, मोनिका पटेल, डिएंड्रा डॉटीन, सबिनेनी मेघना, सोफीया डंक्ली, सुष्मा वर्मा, हर्लीन देओल, हर्ली गाला, स्नेह राणा, अश्विनी कुमारी, जॉर्जिया वरेहम, परुणिका शिसोदिया, तनुजा कनवर, शबमन शकिल.
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB's team for WPL )- स्मृती मानधना, एलिसे पेरी, सोफी डिव्हाईन, रेणुका सिंग, रिचा घोष, एरिन बर्न्स, दीशा कसत, श्रेयंका पाटील, कनिका, ए शोबना, इंद्रानी रॉय, हिदर नाईट, डॅन व्हॅन निएकर्क, प्रीती बोस, पूनम खेमनार, कोमल झांझड, मीगन शुट, सहाना पवार   

  • मुंबई इंडियन्सचा संघ ( Mumbai Indians team for WPL) - हरमनप्रीत कौर, नॅट शिव्हर, एमिलिया केर, पूजा वस्त्राकर, यास्तिका भाटिया, हीदर ग्रॅहम, इसाबेल वोंग, अमनजोत कौर, धारा गुजर, सायका इशाक, हेली मॅथ्यूज, क्लो ट्रायॉन, हुमैरा काझी, प्रियांका बाला, सोनम यादव, जिंतिमणी कलित, नीलम बिष्ट.

३ वर्षांची असताना वडील गेले, आईने लहानाचे मोठे केले; आज पोरीनं कोट्यवधी कमावले

 कोचिंग स्टाफ (  coaching staff )

  • गुजरात जायंट्स - मुख्य प्रशिक्षक - राचेल हायनेस, गोलंदाजी प्रशिक्षक- नूशीन अल खादीर, फलंदाजी प्रशिक्षक - तुषार आरोठे, मेंटॉर व सल्लागार - मिताली राज
  • मुंबई इंडियन्स-  मुख्य प्रशिक्षक - चार्लोट एडवर्ड्स, गोलंदाजी प्रशिक्षक व मेंटॉर - झुलन गोस्वामी, फलंदाजी प्रशिक्षक - देविका पळशिकर 
  • यूपी वॉरियर्स - मुख्य प्रशिक्षक - जॉन लईस, सहाय्यक प्रशिक्षक - अजु जैन व अॅश्ली नॉफके, मेंटॉर - लिसा स्थळेकर
  • दिल्ली कॅपिटल्स - मुख्य प्रशिक्षक - जॉनथन बॅट्टी, सहाय्यक प्रशिक्षक- हेमलता काला व लिसा नाईट्ली, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक- बिजू जॉर्ज  
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - यांनी अद्याप याबाबत घोषणा केलेली नाही.

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :महिला प्रीमिअर लीगमुंबई इंडियन्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरदिल्ली कॅपिटल्स
Open in App