Join us  

Sachin Tendulkar: "काल लिलाव अन् आज सामना सुरू...", चिमुकलीच्या स्फोटक फलंदाजीचा सचिनही झाला 'फॅन'

WPL Auction 2023: महिला प्रीमियर लीग आपल्या पहिल्या हंगामाकडे कूच करत आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 4:39 PM

Open in App

women premier league 2023 । मुंबई : महिला प्रीमियर लीग आपल्या पहिल्या हंगामाकडे कूच करत आहे. काल महिला प्रीमियर लीगसाठी मुंबईत लिलाव पार पडला. पाच फ्रँचायझींनी 87 खेळाडूंवर 59.50 कोटी रुपये खर्च करून पहिला WPL लिलाव संपवला. BCCI ने लिलावासाठी 409 खेळाडूंची निवड केली होती, ज्यात 270 भारतीयांचा समावेश होता. महिला प्रीमियर लीगचा लिलाव पार पडल्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एक व्हिडीओ शेअर करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. 

स्मृती मानधनावर पैशांचा वर्षाव भारतीय संघाची उपकर्णधार स्मृती मानधना महिला प्रीमियर लीगच्या (WPL) लिलावात सर्वाधिक मानधन घेणारी खेळाडू ठरली. तिला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) 3.40 कोटी रुपयांना आपल्या ताफ्यात घेतले. तर भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरला मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीने 1.80 कोटी रुपयांमध्ये आपल्या संघात समाविष्ट केले. याशिवाय मुंबई इंडियन्सने इंग्लंडच्या नॅट शीव्हर ब्रंटला 3.20 कोटी रुपयांना आपल्या संघात घेतले.

दरम्यान, सचिन तेंडुलकरने एका चिमुकलीचा व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती स्फोटक फलंदाजी करताना पाहायला मिळत आहे. "कालच लिलाव पार पडला आणि आज सामना देखील सुरू झाला? 'क्या बात है' तुझ्या फलंदाजीचा खरच आनंद घेतला", अशा आशयाचे ट्विट करून सचिनने या चिमुकलीच्या खेळीचे कौतुक केले. 

WPLच्या पहिल्या हंगामासाठी सर्व 5 संघ खालीलप्रमाणे - दिल्ली कॅपिलट्सचा संघ - मेग लॅनिंग, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, लॉरा हॅरीस, जेसिया अख्तर, मॅरिझन्ने कॅप, शिखा पांडे, राधा यादव, मिन्नू मनी, तितास साधू, तारा नॉरिस, एलिसे कॅप्स, जेस जॉनासेन, स्नेह दीप्ती, अरुंधती रेड्डी, अपर्णा मोंडला, पूनम यादव, तानिया भाटीया

यूपी वॉरियर्स संघ -दीप्ती शर्मा, एस यशश्री, सोफी एक्लेस्टन, लक्ष्मी यादव, ताहलिया मॅग्राथ, देविका वैद्य, शबनिम इस्मैल, ग्रेस हॅरीस, एलिसा हिली, लॉरेन बेल, अंजली सर्वणी, किरण नवगिरे, राजेश्वरी गायकवाड, सिमरन शेख, पार्श्नवी चोप्रा.

गुजरात जायंट्स - ॲश्ली गार्डनर, बेथ मुनी, दयालन हेमलथा, मानसी जोशी, नाबेल सदरलँड, मोनिका पटेल, डिएंड्रा डॉटीन, सबिनेनी मेघना, सोफीया डंक्ली, सुष्मा वर्मा, हर्लीन देओल, हर्ली गाला, स्नेह राणा, अश्विनी कुमारी, जॉर्जिया वरेहम, परुणिका शिसोदिया, तनुजा कनवर, शबमन शकिल.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू -स्मृती मानधना, एलिसे पेरी, सोफी डिव्हाईन, रेणुका सिंग, रिचा घोष, एरिन बर्न्स, दीशा कसत, श्रेयंका पाटील, कनिका, ए शोबना, इंद्रानी रॉय, हिदर नाईट, डॅन व्हॅन निएकर्क, प्रीती बोस, पूनम खेमनार, कोमल झांझड, मीगन शुट, सहाना पवार. 

मुंबई इंडियन्सचा संघ -हरमनप्रीत कौर, नॅट शिव्हर, एमिलिया केर, पूजा वस्त्राकर, यास्तिका भाटिया, हीदर ग्रॅहम, इसाबेल वोंग, अमनजोत कौर, धारा गुजर, सायका इशाक, हेली मॅथ्यूज, क्लो ट्रायॉन, हुमैरा काझी, प्रियांका बाला, सोनम यादव, जिंतिमणी कलित, नीलम बिष्ट.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :महिला प्रीमिअर लीगसचिन तेंडुलकरमहिलाभारतीय महिला क्रिकेट संघ
Open in App