WPL Final: "जा आणि ट्रॉफी घरी आणा...", डिव्हिलियर्सच्या RCB च्या शिलेदारांना खास शुभेच्छा

WPL Final 2024: आज दिल्ली आणि बंगळुरू यांच्यात किताबासाठी लढत होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2024 02:03 PM2024-03-17T14:03:32+5:302024-03-17T15:23:21+5:30

whatsapp join usJoin us
WPL Final 2024, DC vs RCB AB de Villiers wishes both Delhi Capitals and Royal Challengers Bangalore | WPL Final: "जा आणि ट्रॉफी घरी आणा...", डिव्हिलियर्सच्या RCB च्या शिलेदारांना खास शुभेच्छा

WPL Final: "जा आणि ट्रॉफी घरी आणा...", डिव्हिलियर्सच्या RCB च्या शिलेदारांना खास शुभेच्छा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

WPL Final 2024, DC vs RCB: फॉर्मात असलेल्या मागील हंगामातील उपविजेत्या दिल्ली कॅपिटल्सलामहिला प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत गतवर्षी विजेतेपदाने हुलकावणी दिली होती. पण रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्लीचे पहिल्या विजेतेपदाचे लक्ष्य असेल. गतवर्षी पहिल्या सत्राच्या अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सला मुंबई इंडियन्सने सात विकेटने पराभूत केले होते. यावेळी दिल्लीचा संघ शानदार फॉर्मात आहे आणि आठ सामन्यांत १२ गुणांसह त्यांचा संघ पाच संघांमध्ये अव्वल स्थानावर आहे. आजच्या सामन्यासाठी आरसीबीच्या पुरूष संघाचा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्सने खास शुभेच्छा दिल्या आहेत. 

दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लॅनिंगने नेतृत्व करताना आठ डावांत ३०८ धावा केल्या आहेत. तर दक्षिण आफ्रिकेची अष्टपैलू खेळाडू मरियाने कॅप आणि ऑस्ट्रेलियाची डावखुरी फिरकीपटू जेस जोनासन यांनी ११-११ बळी घेतले आहेत. या सत्रात दिल्लीला मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरिअर्स अशा दोन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला होता. याशिवाय त्यांची कामगिरी शानदार झाली आहे. आरसीबीविरुद्ध झालेले सर्व चारही सामने दिल्लीने जिंकले आहेत. पण अंतिम फेरीत मागील कामगिरीमुळे कोणताही फरक पडणार नाही. अंतिम लढतीत दबावाचा सामना करणारा संघ विजेतेपदाचा मानकरी ठरेल. नवी दिल्लीतील अरूण जेटली स्टेडियमवर हा सामना खेळवला जाईल. 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या पुरूष संघाचा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्सने दोन्ही संघांना शुभेच्छा दिल्या. तो म्हणाला की, महिला प्रीमिअर लीगचा आज अंतिम सामना होत आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि आरसीबी या दोन्हीही संघांना माझ्या शुभेच्छा आणि अभिनंदन. ते अंतिम फेरीसाठी पात्र होतेच. आज रात्री जोरात लढत पाहायला मिळेल यात शंका नाही. मी या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहे. खासकरून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला माझ्या खूप खूप शुभेच्छा... त्यांना ऑल दी बेस्ट, जावा आणि ट्रॉफी घरी आणा. 

दोन्हीही संघ खालीलप्रमाणे -
दिल्ली कॅपिटल्स
: मेग लॅनिंग (कर्णधार), लाॅरा हॅरिस, तानिया भाटिया, जेमिमा राॅड्रिग्ज, शेफाली वर्मा, ॲलिस कॅप्सी, मरियाने कॅप, शिखा पांडे, ॲनाबेल सदरलँड, जेस जोनासन, मिन्नू मनी, पूनम यादव, अरुंधती रेड्डी, टिटास साधू, राधा यादव, अश्विनी कुमारी, अपर्णा मंडल, स्नेहा दीप्ती.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु: स्मृती मानधना (कर्णधार), रिचा घोष, दिशा कासट, एस. मेघना, इंद्राणी रॉय, सतीश शुभा, हिथर नाइट, सिमरन बहादूर, एन. डी. क्लेर्क, सोफी डिव्हाइन, श्रेयांका पाटील, ॲलिसे पेरी, आशा शोभना, एकता बिश्त, केट क्रॉस, सोफी मोलिनू, श्रद्धा पोखरकर, रेणुका सिंह, जॉर्जिया वेअरहॅम. 

Web Title: WPL Final 2024, DC vs RCB AB de Villiers wishes both Delhi Capitals and Royal Challengers Bangalore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.