नवी दिल्ली - स्मृती मानधना, एलिस पेरी, शेफाली वर्मा, मेग लँनिंग, जेमिमा राॅड्रिग्स आणि हरमनप्रीत काैर यांच्यासह काही मोठ्या खेळाडूंना फ्रँचायझींनी महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) क्रिकेट स्पर्धेच्या पुढील सत्रासाठी रिटेन (कायम) करण्यात आले आहे.
बंगळुरूने गुरुवारी १४ खेळाडूंना रिटेन करण्याची घोषणा केली. त्यात सहा विदेशी खेळाडूंचाही समावेश आहे. कर्णधार स्मृती, स्टार फलंदाज पेरी आणि यष्टिरक्षक ऋचा घोष यांना डब्ल्यूपीएल विजेत्या संघाने आपल्यासोबत कायम ठेवले आहे. दिल्लीने शेफालीशिवाय जेमिमा राॅड्रिग्स, राधा यादव आणि अरुंधती रेड्डी यांसारख्या खेळाडूंना आपल्यासोबत कायम ठेवले आहे.
विदेशी खेळाडूंमध्ये लेनिंग, दक्षिण आफ्रिकेची मारिजेन कॅप, जेस जोनासेन, एलिस कॅप्सी आणि एनाबेल सदरलँड यांना संघाने आपल्यासोबत कायम ठेवले आहे. डब्ल्यूपीएल २०२५च्या आधी मुंंबईने १४ खेळाडूंना आपल्यासोबत कायम ठेवले आहे. मुंबईने कर्णधार हरमनप्रीत, नेट स्किव्हर ब्रंट, हेली मॅथ्यूज, सजना सजीवन, सेइका इशाक यांसारख्या खेळाडूंना रिटेन केले आहे.
रिटेन खेळाडू मुंबई : हरमनप्रीत कौर, शबनिम इस्माइल, यास्तिका भाटिया, पूजा वस्त्रकार, सजना सजीवन, सेइका इशाक, अमनज्योत कौर, जिंतिमनी कलीता, किर्तना बालाकृष्णन, अमनदीप कौर, नेट स्किव्हर ब्रंट, हेली मॅथ्यूज, अमेलिया केर, शब्निम इस्माइल, क्लो ट्रायोनबंगळुरू : स्मृती मानधना, ऋचा घोष, सब्बिनेनी मेघना, श्रेयंका पाटील, आशा शोभना, रेणुका सिंह, एकता बिष्ट, कनिका आहूजा, केट क्रॉस, डेनियल वॉट हॉज, एलिस पेरी, जॉर्जिया वेयरहॅम, सोफी डिव्हाइन, सोफी मोलिन्यू
दिल्ली : जेमिमा राॅड्रिग्स, शेफाली वर्मा, राधा यादव, अरुंधती रेड्डी, शिखा पांडे, तानिया भाटिया, मीनू मणि, स्नेहा दीप्ती, टिटास साधू, मेग लॅनिंग, मारिजेन कॅप, जेस जोनासेन, एलिस कॅप्सी, एनाबेल सदरलँड