आयपीएलच्या धर्तीवर भारतात सुरु झालेली डब्ल्यूपीएल कधी सुरु झाली आणि कधी संपली याची अनेकांना माहिती देखील नसेल. आपल्याकडे महिलांच्या क्रिकेट संघापेक्षा पुरुषांचा क्रिकेट संघ खूप प्रसिद्ध आहे. काही महिन्यांपूर्वी महिला क्रिकेटरांच्या मानधनात आणि पुरुष क्रिकेटरांच्या मानधनात जमिन आस्मानाचा फरक होता. तो बीसीसीआयने आता कुठे समसमान केला आहे. यातच आता झालेल्या महिला प्रमिअर लीगच्या बक्षीसांच्या रकमांनीही लोकांचे लक्ष वेधले आहे.
PSL Prize Money: पीएसएलच्या विजेत्या संघाला बक्षिसाची रक्कम केवढी? स्मृतीच्या 'मानधना' एवढी; लोक उडवताहेत खिल्ली
वुमन्स प्रीमिअर लीगची फायनल मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये खेळविण्यात आली. मुंबईने ही स्पर्धा जिंकली आहे. दोन्ही संघांमधील हा अंतिम सामना ब्रेबोर्न स्टेडियमवर खेळविण्यात आला. आता चर्चा सुरु झालीय ती ही की विजयी संघाला बक्षिसाची किती रक्कम मिळाली. तुम्हाला पाहून आश्चर्य वाटेल की ही रक्कम नुकत्याच पाकिस्तानात झालेल्या पीएसएलच्या जवळपास तिप्पट आहे.
मुंबई इंडियसन्सला सहा कोटी रुपये मिळाले आहेत. तर दिल्ली कॅपिटल्सला तीन कोटी रुपये मिळाले आहेत. मात्र, हे पैसे आयपीएलच्या तुलनेत कमीच आहेत. गेल्याव वर्षी आयपीएल जिंकणाऱ्या गुजरात टायटन्सला २० कोटी रुपये मिळाले होते. तर उपविजेत्या राजस्थान रॉयल्स संघाला १२.५ कोटी रुपये मिळाले होते. आता सारे आर्थिक गणित असल्याने महिला ट्रॉफीला बक्षीस जरी कमी असले तरी ते ठीकठाक आहे.
डब्लूपीएलची बक्षीसे... कोणाला किती मिळाले...
पॉवरफुल स्ट्रायकर ऑफ द मॅच (ट्रॉफी आणि एक लाख रुपये): राधा यादव
सामनावीर (ट्रॉफी आणि 2.5 लाख रुपये): नताली सायव्हर ब्रंट
पॉवरफुल स्ट्रायकर ऑफ द सीझन (ट्रॉफी आणि रु 5 लाख): सोफी डिव्हाईन
हंगामातील उदयोन्मुख खेळाडू (ट्रॉफी आणि 5 लाख रुपये): यास्तिका भाटिया
फेअरप्ले पुरस्कार: मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स
कॅच ऑफ द सीझन पुरस्कार (ट्रॉफी आणि 5 लाख रुपये): हरमनप्रीत कौर
एका मोसमात सर्वाधिक विकेटसाठी पर्पल कॅप (कॅप आणि रु 5 लाख): हेली मॅथ्यूज
एका मोसमात सर्वाधिक धावांसाठी ऑरेंज कॅप (कॅप आणि रु 5 लाख): मेग लॅनिंग
मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ द सीझन (ट्रॉफी आणि 5 लाख रुपये): हीली मॅथ्यूज
उपविजेता संघ (ट्रॉफी आणि रु. 3 कोटी): दिल्ली कॅपिटल्स
विजेता संघ (ट्रॉफी आणि 6 कोटी रुपये): मुंबई इंडियन्स
Web Title: WPL Prize Money: How many crores of prizes were distributed in Women's Premier League...; Pakistanis will put their fingers in their mouths
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.