Royal Challengers Bangalore, Sania Mirza : महिला प्रीमिअर लीग २०२३ ची जोरदार तयारी सुरू झाली आहे. नुकताचपार पडलेल्या लिलावात स्मृती मानधनासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ( RCB) सर्वाधिक ३.४० कोटींची बोली लावली. WPL Auction मध्ये स्मृती सर्वात महागडी खेळाडू ठरली. एलिसे पेरी, सोफी डिव्हाईन, रिचा घोष आदी स्टार खेळाडूंनाही RCB ने आपल्या ताफ्यात घेतले आणि कागदावर तरी हा संघ सध्या तगडा दिसत आहेत. त्यात RCB ने मोठी घोषणा केली आहे. टेनिस स्टार सानिया मिर्झा ( Sania Mirza Mentor) हिची संघच्या मेंटॉर ( मार्गदर्शक) पदी निवड केली आहे.
महिला प्रीमियर लीगचे वेळापत्रक -
- ४ मार्चपासून स्पर्धेला सुरूवात
- एकूण २२ सामने
- ४ डबल हेडर
- डीवाय पाटील स्टेडियमवर ११ सामने.
- ब्रेबॉर्न स्टेडियमवर ११ सामने.
- २६ मार्चला अंतिम सामना
महिला दुहेरीत सानियाने जिंकलेली विजेतेपदे :-
- ऑस्ट्रेलियन ओपन महिला दुहेरी - 2016 विजेता
- विम्बल्डन - 2015 विजेता
- यूएस ओपन - 2015 विजेता
मिश्र दुहेरीत सानिया मिर्झाचे किताब -
- ऑस्ट्रेलियन ओपन - 2009 विजेता
- फ्रेंच ओपन - 2012 विजेता
- यूएस ओपन - 2014 विजेता
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB's team for WPL )- स्मृती मानधना, एलिसे पेरी, सोफी डिव्हाईन, रेणुका सिंग, रिचा घोष, एरिन बर्न्स, दीशा कसत, श्रेयंका पाटील, कनिका, ए शोबना, इंद्रानी रॉय, हिदर नाईट, डॅन व्हॅन निएकर्क, प्रीती बोस, पूनम खेमनार, कोमल झांझड, मीगन शुट, सहाना पवार
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"