आक्रमक फलंदाजी केल्यानंतर नियंत्रित गोलंदाजी करत गुजरात टायटन्स संघाने एकतर्फी झालेल्या सामन्यात लखनौ सुपरजायंटस्ला ५६ धावांनी नमवले. यासह गुजरातने प्ले-ऑफमधील आपले स्थान जवळपास निश्चित करण्यासह १६ गुणांची कमाई करत गुणतालिकेतील अव्वल स्थान अधिक भक्कम केले.
गुजरातने प्रथम फलंदाजी करताना शुबमन गिलच्या नाबाद ९४ धावा आणि वृद्धिमान साहाच्या ८१ धावांच्या बळावर २ बाद २२७ धावा केल्या. सलामीवीर वृद्धिमान साहाने दमदार सुरूवात मिळवून दिली. त्यामुळे गुजरातने पहिल्या ६ षटकांत ७८ धावा केल्या होत्या. त्यानंतर वृद्धिमान साहाने २० चेंडूत तर शुबमन गिलने २९ चेंडूत अर्धशतक ठोकले. वृद्धिमान साहा १० चौकार आणि ४ षटकारांच्या साथीने ४३ चेंडूमध्ये ८१ धावा केल्या.
गुजरातविरुद्ध लखनौच्या सामन्यात वृद्धीमान साहाच्या आक्रमक फलंदाजीची जोरदार चर्चा रंगली. त्यासोबतच त्याने घातलेल्या उलट्या पँटची देखील सोशल मीडियावर खूप चर्चा झाली. फिल्डिंग करताना साहा दोन षटकानंतर तंबूत परतला. त्याच्या जागी केएस भरतने विकेटकिपिंगची जबाबदारी सांभाळली. लखनौची फलंदाजी सुरु झाली त्यावेळीच भरत विकेटकिपिंगसाठी आला होता. पण पंचांनी यावर आक्षेप घेतला. त्यामुळे साहाला विकेटकिपिंगसाठी मैदानात यावे लागले. गडबडीत तयार होऊन येताना वृद्धीमान साहा याने उलटी पँट घातल्याचे समोर आले. सोशल मीडियावर साहाचा व्हिडीओ व्हायरल झाले.
सदर घटनेवर स्वत: वृद्धिमान साहा याने स्पष्टीकरण दिलं आहे. माझ्याजागी केएस भरत विकेटकिंपिंग करणार होता. मी जेवायला बसलो आणि समजले की पंचानी भरतला विकेटकिंपिंग करण्यास परवानगी नाकारली. त्यानंतर मी तसेच जेवण सोडले. मी खूप घाईत होतो. त्यावेळी मी माझी पँट उलटी घातली. मैदानात गेल्यानंतर ते माझ्या लक्षात आले. मग मी दोन षटकानंतर पँट बदलली, असं साहा याने सांगितले.
Web Title: Wriddhiman Saha explains why he put on trousers other way around during GT-LSG clash
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.