India tour of England : इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघासमोरील संकट वाढत चालले आहे. रिषभ पंतचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर थ्रोडाऊन स्पेशालिस्ट दयानंदा यांचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यांच्या संपर्कात आल्यामुळे भारताचा आणखी एक यष्टिरक्षक वृद्धीमान सहा याला विलगिकरणात जावे लागले आहे. इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वातील पहिल्या टप्प्यात सहाला कोरोनाची लागण झाली होती आणि त्यानं त्यावर यशस्वी मात केली होती. ( Wriddhiman saha will have to go into isolation as close contact of throwdown specialist Dayananda tests COVID-19 positive)
- कोरोना पॉझिटिव्ह - रिषभ पंत ( आठवड्यापासून विलगिकरणात) आणि दयानंत घरानी ( थ्रोडाऊन स्पेशालिस्ट)
- विलगिकरणात, परंतु निगेटिव्ह रिपोर्ट - भरत अरुण, राखीव यष्टिरक्षक वृद्धीमान सहा, राखीव सलामीवीर अभिमन्यू इस्वरन
जय शाह यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष!
जय शाह यांनी त्यांच्या ई मेलमध्ये खेळाडूंना गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळण्यास सांगितले होते. त्यांनी हेही म्हटले होते की, ''Covishield लस तुम्हाला फक्त सुरक्षा पुरवेल, व्हायरसपासून पूर्णपणे वाचवणार नाही.'' शाह यांनी खेळाडूंना विम्बल्डन आणि यूरो स्पर्धेत जाण्याचे टाळण्यास सांगितले होते.
सराव सामन्यात कोण दिसणार यष्टिरक्षकाच्या भूमिकेत
भारताचा तीन दिवसीय सराव सामना २० जुलैपासून सुरू होणार आहे आणि कौंटी क्रिकेटमधील एकादश संघाविरुद्ध डरहॅम येथे हा सामना खेळवण्यात येणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या तयारीसाठी टीम इंडियाला या सराव सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. ''भारतीय संघाविरुद्ध कौंटी क्रिकेटमधील ११ खेळाडू खेळतील,''असे सूत्रांनी सांगितले आहे. हा सराव सामना बंद स्टेडियममध्ये खेळवळ्यात येणार असून प्रती दिवस ९० षटकांचा खेळ होणार. या सामन्याचे प्रक्षेपण Durham Cricket's YouTube channel वर होणार आहे. रिषभ व सहा दोघंही विलगिकरणात असल्यामुळे सराव सामन्यात कोण यष्टिरक्षण करणार याची चर्चा सुरू झाली आहे.
भारतीय संघ - विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शुबमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्वि, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर, उमेश यादव, लोकेश राहुल व वृद्धीमान सहा; राखीव खेळाडू - अभिमन्य इस्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्झान नागवास्वाला
इंग्लंड दौऱ्याचे वेळापत्रक
४ ते ८ ऑगस्ट - ट्रेंट ब्रिज
१२ ते १६ ऑगस्ट - लॉर्ड्स
२५ ते २९ ऑगस्ट- हेडिंग्ले
२ ते ६ सप्टेंबर - ओव्हल
१० ते १४ सप्टेंबर - ओल्ड ट्रॅफर्ड
Web Title: Wriddhiman saha will have to go into isolation as close contact of throwdown specialist Dayananda tests COVID-19 positive
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.