उद्यापासून टेस्ट क्रिकेटच्या वर्ल्डकपची फायनल खेळविली जाणार आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलियन संघाला भिडणार आहे. हा सामना पाहण्यासाठी अनेकांनी तिकिटे खरेदी केली आहेत. तसेच टीव्ही, ऑनलाईनही पाहिला जाणार आहे. परंतू, लंडनहून समस्त क्रिकेटप्रेमींची धाकधूक वाढविणारी बातमी येत आहे. आयसीसी डब्ल्यूटीसी फायनलवर दोन दिवस पावसाचे सावट असणार आहे.
WTC फायनलमध्ये नियम बदलले; टीम इंडियाला फायदा होणार की तोटा? जाणून घ्या...
WTC फायनलमध्ये खेळण्याची ही भारताची दुसरी वेळ आहे. तर ऑस्ट्रेलियाची ही पहिलीच वेळ आहे. पहिला वर्ल्डकप न्यूझीलंडने जिंकला होता. या सामन्याच्या पहिले दोन दिवस स्वच्छ हवामान असणार आहे. परंतू तिसरा आणि चौथा दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पाच दिवसांच्या या खेळात तापमान 18 ते २२ डिग्री सेल्सियस असेल. परंतू, आयसीसीने सहावा दिवस राखीव ठेवला आहे.
जर पावसामुळे किंवा अन्य कोणत्याही कारणाने खेळ वाया गेला तर राखीव दिवसाचा वापर केला जाणार आहे. परंतू जर पाचही दिवस विना व्यत्यय खेळ झाला तर सहावा दिवस वापरला जाणार नाहीय. अशावेळी जर सामना ड्रॉ झाला तर काय? कोण जिंकणार? असा प्रश्न क्रिकेटप्रेमींनी सतावू लागला आहे.
अंतिम सामना अनिर्णित राहिला तर भारत आणि ऑस्ट्रेलियाला संयुक्त विजेता घोषित केले जाईल. सामना बरोबरीत संपला तरी दोन्ही संघ संयुक्तपणे चॅम्पियन होतील. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात केवळ दोनच सामने बरोबरीत संपले आहेत. 1960 मध्ये प्रथमच वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ब्रिस्बेन कसोटी सामना झाला. त्यानंतर 1986 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चेन्नई कसोटी सामना बरोबरीत संपला होता. या दोन्ही वेळी ऑस्ट्रेलियाच कॉमन होता.
भारत आणि ऑस्ट्रेलियाचे रेकॉर्ड (ओव्हल मैदान)• भारत - 14 कसोटी, 2 विजय, 5 पराभव, 7 अनिर्णित• ऑस्ट्रेलिया - 38 सामने, 7 विजय, 17 पराभव, 14 अनिर्णित
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी रेकॉर्डएकूण 106 सामने - भारताने 32 जिंकले, ऑस्ट्रेलियाने 44 जिंकले, 29 अनिर्णित, 1 बरोबरीत