WTC 2025 First Finalist South Africa Book WTC Final Spot With Thrilling Win Over Pakistan : दक्षिण आफ्रिकेच्या संघानं घरच्या मैदानात रंगलेल्या पाक विरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात थरारक विजय नोंदवला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेचा संघ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील तिसऱ्या हंगामातील फायनलसाठी पात्र होणारा पहिला संघ ठरला आहे. सेंच्युरियनच्या सुपर स्पोर्ट पार्क मैदानात रंगलेल्या पाक विरुद्धच्या सामन्यात १४८ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघानं चौथ्या दिवशी दोन विकेट्स राखून सामना जिंकला. पाक विरुद्धच्या दोन सामन्यात त्यांनी १-० आघाडी घेताना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या शर्यतीत असलेल्या भारत-ऑस्ट्रेलिया यांना मागे टाकून फायनलमध्ये एन्ट्री मारली.
दक्षिण आफ्रिकेचा पहिला नंबर, फर्स्ट क्लास कामगिरीसह मिळवल फायनलचं तिकीट
WTC च्या तिसऱ्या चक्रात ११ सामन्यातील ७ व्या विजयासह दक्षिण आफ्रिकेच्या संघानं ६६.६७ टक्के विनिंग पर्सेंटेजसह फायनलचं तिकीट मिळवले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एक संघ दुसऱ्या फायनलिस्टच्या रुपात क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्ड्सच्या मैदानात रंगणाऱ्या फायनलसाठी पात्र ठरेल.
दुसऱ्या फायनलिस्टसाठी भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात तगडी फाइट
भारतीय संघानं आतापर्यंत झालेल्या दोन्ही हंगामात फायनलपर्यंत मजल मारल्याचे पाहायला मिळाले. पहिल्या हंगामात न्यूझीलंडनं तर दुसऱ्या हंगामात ऑस्ट्रेलियानं फायनलमध्ये टीम इंडियाचे जेतेपदाचे स्वप्न धुळीस मिळवले. त्यानंतर यंदाच्या हंगामातही टीम इंडिया WTC फाय़नलच्या शर्यतीत आघाडीवर होती. पण घरच्या मैदानातील न्यूझीलंड विरुद्धच्या ३-० अशा पराभवामुळे टीम इंडियाची गणिते बिघडली. सध्याच्या घडीला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी टीम इंडियासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धची बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धा महत्त्वपूर्ण झाली आहे. WTC फायनलच्या दुसऱ्या तिकीटासाठी ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात तगडी फाइट आहे.
भारतीय संघाकडे दोन तर ऑस्ट्रेलियाकडे ४ सामने बाकी
सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलियन संघ १५ पैकी ९ सामन्यातील विजयासह ५८ टक्के विनिंग पर्सेंटेजसह आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅमिपियनशिप गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे १७ पैकी ९ सामन्यातील विजयासह भारतीय संघ ५५.८८ टक्के विनिंग पर्सेंटेजसह तिसऱ्या स्थानावर आहे. मेलबर्न कसोटी सामन्यासह सिडनीत रंगणारा कसोटी सामना भारतीय संघाला WTC फायनलची दावेदारी भक्कम करण्यासाठी महत्त्वाचा आहे. ऑस्ट्रेलिया संघाला टीम इंडियाविरुद्धच्या मालिकेनंतर श्रीलंकेविरुद्ध २ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेपर्यंत दुसऱ्या फायनलिस्ट कोण याची प्रतिक्षा करावी लागू शकते.
Web Title: WTC 2025 First Finalist: Thrilling match against Pakistan; South Africa books final ticket by winning the match Australia vs India
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.