Join us  

WTC Final 2021: समर्थन टीम इंडियाला पण, मन न्यूझीलंडच्या बाजूनं! 

२०१९ चा वर्ल्ड कप कोणीच विसरणार नाही. रेकॉर्डमध्ये तो वर्ल्ड कप इंग्लंडच्या नावावर असला तरी जगभरातील क्रिकेट चाहत्यांसाठी न्यूझीलंडच विजेते आहेत आणि राहतील..

By स्वदेश घाणेकर | Published: March 07, 2021 9:00 AM

Open in App

स्वदेश घाणेकर 

टीम इंडियानं आज इंग्लंडला चारीमुंड्या चीत केलं. पहिल्या कसोटीत पराभव पत्करल्यानंतर टीम इंडिया असा कमबॅक करेल असे इंग्लंडला वाटले नसावे.. सलग तीन सामने २-३ दिवसांच्या आत संपवले.. टीम इंडियाला डिवचलं की ते आणखी जोशात खेळात हे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर साऱ्यांनी पाहिले होते, हे तर घरचं मैदान होतं.. त्याचा फायदा उचलायलाच हवा आणि तो टीम इंडियानं उचलला... रोहित शर्मा, आर अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, रिषभ पंत आणि अक्षर पटेल ( हे नाव आवर्जून घ्यायला पाहिजे. कित्येक वर्षानंतर त्याला कसोटीत खेळण्याची संधी मिळाली आणि ३ सामन्यांत २७ विकेट्स घेत, त्यानं सोनं केलं. ) यांनी ही मालिका गाजवली. विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांचा फॉर्म चिंतेचा विषय आहे, पण महत्त्वाच्या सामन्यात हेच त्रिकूट आपल्याला तारणार, हा विश्वासही आहे. १०० कसोटीचा अनुभव असलेला इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज यांनी त्यांच्या जबाबदारीला न्याय दिला. जूनपर्यंत मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या हेही तंदुरुस्त होतीलच.. 

आता आव्हान किवींचं... इंग्लंडला ३-१ असे लोळवून टीम इंडियानं  दिमाखात जागतिक कसोटी अजिंक्यपद ( #ICCWORLDTESTCHAMPIONSHIP ) च्या फायनलमध्ये एंट्री घेतली. क्रिकेटच्या पंढरीत अर्थात लॉर्ड्सवर ही फायनल आधी नियोजित होती, परंतु आता ती अन्यत्र हलवण्यात येण्याची हालचाल सुरू आहेत. ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिका दौरा रद्द केला आणि न्यूझीलंडचा अंतिम सामन्यातील प्रवेश पक्का झाला. पण, म्हणून न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाच्या कृपेने अंतिम सामना खेळणार असे अजिबात नाही. त्यांनी घरच्या मैदानावर भारत, पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजला व्हाईटवॉश दिला.. श्रीलंका दौऱ्यात १-१ अशी बरोबरी मिळवली. एवढचं नाही तर केन विलियम्सनच्या नेतृत्वाखाली इतिहासात प्रथम आयसीसी जागतिक कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. केन विलियम्सन, टॉम लॅथम, रॉस टेलर चांगल्या टचमध्ये आहेत.. टीम साऊदी, कायले जेमिन्सन, ट्रेंट बोल्ड, नील वॅगनर हे आग ओकत आहेत.. अशात लंडनमध्ये किवींना पोषक वातावरणात टीम इंडियाला करिष्मा करावा लागले..

आता किवींची बारी... २०१९ चा वर्ल्ड कप कोणीच विसरणार नाही. रेकॉर्डमध्ये तो वर्ल्ड कप इंग्लंडच्या नावावर असला तरी जगभरातील क्रिकेट चाहत्यांसाठी न्यूझीलंडच विजेते आहेत आणि राहतील.. इंग्लंडला त्यांच्याच घरच्या मैदानावर किवींनी रडकुंडीला आणले होते. त्यामुळे १८ जूनला जेव्हा न्यूझीलंड टीम इंडियाचा सामना करायला उतरेल तेव्हा २०१९ च्या वन डे वर्ल्ड कपच्या आठवणी नक्की ताज्या होतील. जरी आपण टीम इंडियाचे समर्थक असू तरी आपलं मन कसोटीचा वर्ल्ड कप न्यूझीलंडने जिंकावा, हे कुठेतरी आपल्याला सांगत राहील... ही लढत फक्त २-३ दिवसांत संपू नये, कारण त्या विजयाल अर्थ नसेल. फायनलसाठीचा राखीव दिवसही सत्कारणी लागला तर कंटाळा वाटणार नाही.. Best Team Will Win, असच सध्या म्हणूयात आणि त्या फायनलपूर्वी #IPL2021 ची मजा घेऊयात... 

टीम इंडियाच वर्ल रेकॉर्ड...

भारताने वन डे, ट्वेंटी-20 आणि आता कसोटी वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहचून इतिहास घडवला आहे. तीनही फॉरमॅटच्या वर्ल्ड कप फायनल मध्ये पोहोचणारा तो एकमेव संघ आहे. 

विराट Vs केन 

२००८ : १९ वर्षांखालील वर्ल्ड कप उपांत्य फेरी

२०१९ : वन डे वर्ल्ड कप उपांत्य फेरी 

टॅग्स :भारतन्यूझीलंडआयसीसीजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा