Join us

WTC final 2021 Ind vs NZ 1st Test : काळजाचा ठोका चुकला, किवी गोलंदाजाच्या बाऊन्सरनं चेतेश्वर पुजाराच्या हेल्मेटलचे केले दोन तुकडे...

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलच्या पहिल्या दिवसाचे पहिले सत्र दोन्ही संघांच्या नावावार.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2021 18:30 IST

Open in App

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलच्या पहिल्या दिवसाचे पहिले सत्र दोन्ही संघांच्या नावावार. रोहित शर्मा व शुबमन गिल यांची दमदार सुरूवात करून दिली, परंतु न्यूझीलंडचे गोलंदाज कायले जेमिन्सन व निल वॅगनर यांनी दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवले. न्यूझीलंडनं कमबॅक करताना लंच ब्रेकपर्यंत भारताला 28 षटकानंतर 2 बाद 69 धावांवर रोखले. त्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांनी टीम इंडियाचा डाव सावरला.  रोहित व शुबमन यांची 62 धावांची भागीदारी कायले जेमिन्सननं संपुष्टात आणली. विशेष म्हणजे ही विकेट घेण्यापूर्वी जेमिन्सननं 5 षटकं फेकली अन् त्याच्या एकाही चेंडूचा रोहितनं सामना केला नाही. सहाव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर जेमिन्सननं रोहितला स्लीपमध्ये उभ्या असलेल्या टीम साऊदी करवी 34 धावांवर बाद केले. निल वॅगनर यानं त्याच्या पहिल्याच षटकात शुबमन गिलला ( 28 ) बाद केले. WTC Final 2021, WTC Final 2021

विराट व पुजारा यांनी संयमी खेळ करताना टीम इंडियाची आणखी विकेट पडू दिली नाही. पूजारानं 35 चेंडू निर्धाव खेळल्यानंतर पहिली धाव चौकारानं घेतली. 37व्या षटकात निल वॅगनरनं टाकलेला बाऊन्सनर पुजाराच्या हेल्मेटवर जोरात आदळला अन् त्याच्या हेल्मेटचे दोन तुकडे झाले. त्यानंतर लगेचच टीम इंडियाची वैद्यकिय टीम धाऊन आली. प्राथमिक उपचारानंतर पुजारानं पुन्हा खेळण्यास सुरूवात केली.  Ind vs NZ Test Final, WTC final 2021 -  टीम इंडियाचे खेळाडू दंडावर काळी पट्टी बांधून मैदानावर उतरलेले पाहायला मिळाले. भारताचे दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांना टीम इंडियाच्या खेळाडूंनी काळी पट्टी बांधून श्रद्धांजली वाहिली. 

-  विराट कोहलीचा कर्णधार म्हणून हा 61 वा सामना आहे आणि आशियाई कर्णधार म्हणून हा विक्रम आहे. त्यानं महेंद्रसिंग धोनीचा 60 सामन्यांचा विक्रम मोडला.  

- या सामन्यात रोहित शर्मानं आगळावेगळा विक्रम नोंदवला.. आयसीसीच्या दोन प्रमुख स्पर्धांच्या पहिल्या वहिल्या पर्वाच्या अंतिम फेरीत खेळणारा तो जगातील एकमेव खेळाडू आहे. 2007 च्या पहिल्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कपची फायनल तो खेळला होता अन् आज जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल तो खेळत आहे.

टॅग्स :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाचेतेश्वर पुजाराविराट कोहलीरोहित शर्माशुभमन गिल