World Test Championship (WTC) final India vs New Zealand : रोहित शर्मा व शुबमन गिल यांनी टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली. पण, न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी कमबॅक करताना पहिल्या सत्रातच दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवले. कर्णधार विराट कोहली व चेतेश्वर पुजारा यांनी जवळपास 15 षटके खेळून काढली. मात्र, त्यांचा धावांची गत अत्यंत संथ होती. पुजारा 54 चेंडूंत 8 धावा करून माघारी परतला. त्यानंतर विराटनं उप कर्णधार अजिंक्य रहाणेसह भारताचा खेळ पुढे सुरू ठेवला. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. WTCमध्ये भारताकडून सर्वाधिक पाचवेळा 50+ भागीदारीचा विक्रम या जोडीनं नावावर केला. अंधुक प्रकाशामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळवण्याचा निर्णय घेतला गेला. WTC Final 2021, WTC Final 2021, Ind vs NZ Test Final
अम्पायरनं केली चिटिंग, न्यूझीलंडचा DRS वाचवला; विराट कोहलीनं कडक शब्दात जाब विचारला
रोहित शर्मा व शुबमन गिल यांची दमदार सुरूवात करून दिली, परंतु न्यूझीलंडचे गोलंदाज कायले जेमिन्सन व निल वॅगनर यांनी दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवले. रोहित ( 34) व शुबमन ( 28) यांची 62 धावांची भागीदारी कायले जेमिन्सननं संपुष्टात आणली. विराट व पुजारा यांनी संयमी खेळ करताना टीम इंडियाचा डाव सावरला होता. पूजारानं 54 चेंडूंत दोन चौकारांसह 8 धावा केल्या. पुजारा व विराट यांनी तिसऱ्या विकेटसाठी 95 चेंडूंत 25 धावांची भागीदारी केली. विराट कोहलीनं सचिन तेंडुलकरनंतर चौथ्या क्रमांवर 6000 हून अधिक धावा करण्याचा विक्रम केला. भारताकडून कसोटीत हा पराक्रम करणारा विराट दुसराच फलंदाज ठरला. ( Most Test runs while batting at No.4). सचिन तेंडुलकरनं 13492 धावा केल्या आहेत. WTC final 2021, Ind vs Nz WTC Final Today, IND vs NZ World Test Championship
सचिन तेंडुलकरनंतर आता विराट कोहलीच; पहिल्याच दिवशी नोंदवला भारी विक्रम
इंग्लंडमध्ये 600+ धावा करणारा विराट हा पहिलाच आशियाई कर्णधार आहे. विराटनं आतापर्यंत 626* धावा केल्या आहेत. ( Most runs by an Asian captain in England Tests). महेंद्रसिंग धोनी ( 569), मोहम्मद अझरुद्दीन ( 468), अँजेलो मॅथ्यूज ( 431) आणि इम्रान खान ( 403) यांचा नंतर नंबर येतो. ( Virat Kohli is the first ever Asian captain to score 600+ Test runs in England.) अजिंक्य रहाणेही कसोटी क्रिकेटमध्ये 3000 धावा पूर्ण केल्या. विराट व अजिंक्यनं चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना दुसऱ्या दिवशी भारताची धावसंख्या 3 बाद 146 धावांपर्यंत नेली. विराट कोहली 44, तर अजिंक्य रहाणे 29 धावांवर खेळत आहेत. भारतीय फलंदाजांनी 64.4 षटकांत 2.25च्या सरासरीनं धावा केल्या.