World Test Championship (WTC) final India vs New Zealand : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलच्या पहिल्या दिवसाचे पहिले सत्र दोन्ही संघांच्या नावावार. रोहित शर्मा व शुबमन गिल यांची दमदार सुरूवात करून दिली, परंतु न्यूझीलंडचे गोलंदाज कायले जेमिन्सन व निल वॅगनर यांनी दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवले. न्यूझीलंडनं कमबॅक करताना लंच ब्रेकपर्यंत भारताला 28 षटकानंतर 2 बाद 69 धावांवर रोखले. क्रिकेटच्या मैदानावर भारत-न्यूझीलंड यांची टक्कर सुरू असताना कॉमेंट्री बॉक्समध्ये भारत-इंग्लंड सामना पाहायला मिळाला.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलसाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिक व महान फलंदाज सुनील गावस्कर आहेत. त्यांच्यासोतब इंग्लंडचा माजी कर्णधार नासीर हुसैनही आहे. या सामन्याच्या पहिल्या सहा षटकांत कार्तिक व हुसैन यांनी कॉमेंट्री केली. तेव्हा रोहितनं दमदार पुल शॉट्स मारले. हुसैननं भारताच्या सलामीवीराचे कौतुक केले, परंतु कार्तिकनं तेव्हा त्याची फिरकी घेतली.
''शॉर्ट बॉलवर रोहित दमदार पूल शॉट्स मारतो. फिरकी गोलंदाजीवरही तो पदलालित्याचा वापर करतो. त्याच्या खेळीतून सकारात्मक दृष्टीकोन दिसतो,'' असे हुसैन म्हणाला. त्यावर कार्तिकनं लगेच प्रत्युत्तर दिले आणि हुसैनची फिरकी घेतली. कार्तिक म्हणाला,''हो हे खरंय.. बरोबर हे सर्व तुझ्या परस्पर विरुद्ध आहे.''