World Test Championship (WTC) final India vs New Zealand : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलला अखेर आजपासून सुरूवात झाली. पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेला, परंतु दुसऱ्या दिवशी त्यानं विश्रांती घेतली. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन यानं नाणेफेक जिंकून टीम इंडियाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. रोहित शर्मानं पहिलाच चेंडू डाव्या बाजूला टोलवून तीन धावा घेतल्या, परंतु 9व्या चेंडूवर शुबमन गिल धावबाद होता होता वाचला. या सामन्यात टीम इंडियाचे खेळाडू दंडावर काळी पट्टी बांधून मैदानावर उतरलेले पाहायला मिळाले. भारताचे दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांना टीम इंडियाच्या खेळाडूंनी काळी पट्टी बांधून श्रद्धांजली वाहिली. ( Indian players wearing black armbands today to pay tribute to the late Milkha Singh )
RECORD ALERT: विराटने MS Dhoniचा विक्रम मोडला, तर रोहित शर्मानं केला जगात भारी पराक्रम
- विराट कोहलीचा कर्णधार म्हणून हा 61 वा सामना आहे आणि आशियाई कर्णधार म्हणून हा विक्रम आहे. त्यानं महेंद्रसिंग धोनीचा 60 सामन्यांचा विक्रम मोडला.
- या सामन्यात रोहित शर्मानं आगळावेगळा विक्रम नोंदवला.. आयसीसीच्या दोन प्रमुख स्पर्धांच्या पहिल्या वहिल्या पर्वाच्या अंतिम फेरीत खेळणारा तो जगातील एकमेव खेळाडू आहे. 2007 च्या पहिल्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कपची फायनल तो खेळला होता अन् आज जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल तो खेळत आहे.
‘फ्लाइंग सिख’ मिल्खा सिंग यांचे निधन; कोरोना पश्चात लढाई हरलेभारताचे माजी दिग्गज धावपटू मिल्खा सिंग (Milkha Singh) यांचे कोरोनामुळे शुक्रवारी रात्री निधन झाले. एक महिन्यापासून त्यांचा कोरोनाविरुद्ध लढा सुरू होता. मिल्खा सिंग यांच्या पत्नी व भारताच्या व्हॉलिबॉल संघाच्या माजी कर्णधार निर्मल कौर यांनी कोरोना संक्रमणामुळे पाच दिवसांपूर्वी अखेरचा श्वास घेतला होता. पद्मश्री मिल्खा सिंग यांनी वयाच्या ९१व्या वर्षी शुक्रवारी रात्री ११.३०च्या सुमारास रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात मुलगा जीव मिल्खा सिंग व तीन मुली असा परिवार आहे.
मिल्खा सिंग यांनी चार वेळा आशियाई स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक पटकावले असून १९५८ सालच्या राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्ण कामगिरी केली होती. १९६० सालच्या रोम ऑलिम्पिकमध्ये काही शतांशच्या फरकाने त्यांचे कांस्य पदक हुकले होते. १९५९ साली मिल्खा सिंग यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते.