World Test Championship (WTC) final India vs New Zealand : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलला अखेर आजपासून सुरूवात झाली. पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेला, परंतु दुसऱ्या दिवशी त्यानं विश्रांती घेतली. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन यानं नाणेफेक जिंकून टीम इंडियाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. रोहित शर्मानं पहिलाच चेंडू डाव्या बाजूला टोलवून तीन धावा घेतल्या, परंतु 9व्या चेंडूवर शुबमन गिल धावबाद होता होता वाचला. त्यानंतर रोहित व शुबमन या जोडीनं टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी सुरूवातीची 10 षटकं सावधपणे खेळून काढली, परंतु 21व्या षटकात चूक झाली अन् टीम इंडियाला पहिला धक्का बसला. WTC Final 2021, WTC Final 2021
- टीम इंडियाचे खेळाडू दंडावर काळी पट्टी बांधून मैदानावर उतरलेले पाहायला मिळाले. भारताचे दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांना टीम इंडियाच्या खेळाडूंनी काळी पट्टी बांधून श्रद्धांजली वाहिली.
- विराट कोहलीचा कर्णधार म्हणून हा 61 वा सामना आहे आणि आशियाई कर्णधार म्हणून हा विक्रम आहे. त्यानं महेंद्रसिंग धोनीचा 60 सामन्यांचा विक्रम मोडला.
- या सामन्यात रोहित शर्मानं आगळावेगळा विक्रम नोंदवला.. आयसीसीच्या दोन प्रमुख स्पर्धांच्या पहिल्या वहिल्या पर्वाच्या अंतिम फेरीत खेळणारा तो जगातील एकमेव खेळाडू आहे. 2007 च्या पहिल्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कपची फायनल तो खेळला होता अन् आज जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल तो खेळत आहे. Ind vs NZ Test Final, WTC final 2021
रोहित व शुबमन यांची 62 धावांची भागीदारी कायले जेमिन्सननं संपुष्टात आणली. विशेष म्हणजे ही विकेट घेण्यापूर्वी जेमिन्सननं 5 षटकं फेकली अन् त्याच्या एकाही चेंडूचा रोहितनं सामना केला नाही. सहाव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर जेमिन्सननं रोहितला स्लीपमध्ये उभ्या असलेल्या टीम साऊदी करवी 34 धावांवर बाद केले. IND vs NZ World Test Championship