World Test Championship (WTC) final India vs New Zealand : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा पहिला दिवस पावसामुळे वाया गेला. दुसऱ्या दिवसाच्या खेळावरही पावसाचे सावट आहे, परंतु मागील 12 तासांपासून पावसानं विश्रांती घेतली आहे. नाणेफेकीचा कौल टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या विरोधात गेला. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सननं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मानं पहिलाच चेंडू लेग साईटला टोलवून तीन धावा घेतल्या. पण, मैदानावर उतरताच त्यानं जगात भारी विक्रम नोंदवला.
1877 साली पहिला कसोटी सामना खेळवण्यात आला आणि तब्बल 144 वर्षांनी पहिली कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल खेळवली जात आहे. विराट कोहलीचा कर्णधार म्हणून हा 61 वा सामना आहे आणि आशियाई कर्णधार म्हणून हा विक्रम आहे. त्यानं महेंद्रसिंग धोनीचा 60 सामन्यांचा विक्रम मोडला.
या सामन्यात
रोहित शर्मानं आगळावेगळा विक्रम नोंदवला.. आयसीसीच्या दोन प्रमुख स्पर्धांच्या पहिल्या वहिल्या पर्वाच्या अंतिम फेरीत खेळणारा तो जगातील एकमेव खेळाडू आहे. 2007 च्या पहिल्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कपची फायनल तो खेळला होता अन् आज जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल तो खेळत आहे. WTC Final 2021, WTC Final 2021, Ind vs NZ Test Final
भारतीय संघ- रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रिषभ पंत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी IND vs NZ World Test Championship
न्यूझीलंडचा संघ - टॉम लॅथम, डेव्हॉन कॉनवे, केन विलियम्सन, रॉस टेलर, हेन्री निकोल्स, बी जे वॉटलिंग, कॉलिन डी ग्रँडहोम, टीम साऊदी, कायले जेमिन्सन, ट्रेंट बोल्ट, निल वॅगनर
Web Title: WTC final 2021 Ind vs NZ 1st Test : RECORD ALERT: Rohit Sharma becomes the first player to feature in two inaugural ICC event finals
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.