World Test Championship (WTC) final India vs New Zealand : रोहित शर्मा व शुबमन गिल यांनी टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली. पण, न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी कमबॅक करताना पहिल्या सत्रातच दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवले. कर्णधार विराट कोहली व चेतेश्वर पुजारा यांनी जवळपास 15 षटके खेळून काढली. मात्र, त्यांचा धावांची गत अत्यंत संथ होती. पुजारा 54 चेंडूंत 8 धावा करून माघारी परतला. त्यानंतर विराटनं उप कर्णधार अजिंक्य रहाणेसह भारताचा खेळ पुढे सुरू ठेवला. या कामगिरी दरम्यान विराटनं मोठ्या विक्रमाची नोंद केली. WTC Final 2021, WTC Final 2021, Ind vs NZ Test Final
अम्पायरनं केली चिटिंग, न्यूझीलंडचा DRS वाचवला; विराट कोहलीनं कडक शब्दात जाब विचारला
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलच्या पहिल्या दिवसाचे पहिले सत्र दोन्ही संघांच्या नावावार. रोहित शर्मा व शुबमन गिल यांची दमदार सुरूवात करून दिली, परंतु न्यूझीलंडचे गोलंदाज कायले जेमिन्सन व निल वॅगनर यांनी दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवले. रोहित ( 34) व शुबमन ( 28) यांची 62 धावांची भागीदारी कायले जेमिन्सननं संपुष्टात आणली. विराट व पुजारा यांनी संयमी खेळ करताना टीम इंडियाचा डाव सावरला होता. पूजारानं 35 चेंडू निर्धाव खेळल्यानंतर पहिली धाव चौकारानं घेतली. ही जोडी तोडण्यास ट्रेंट बोल्टला पाचारण करण्यात आले आणि त्यानं 54 चेंडूंत दोन चौकारांसह 8 धावा करणाऱ्या पुजाराला पायचीत करून माघारी पाठवले. पुजारा व विराट यांनी तिसऱ्या विकेटसाठी 95 चेंडूंत 25 धावांची भागीदारी केली. WTC Final Today, Ind Vs NZ test Score, NZ vs IND Test today
काळजाचा ठोका चुकला, किवी गोलंदाजाच्या बाऊन्सरनं चेतेश्वर पुजाराच्या हेल्मेटलचे केले दोन तुकडे...
इंग्लंडमध्ये 600+ धावा करणारा विराट हा पहिलाच आशियाई कर्णधार आहे. विराटनं आतापर्यंत 626* धावा केल्या आहेत. ( Most runs by an Asian captain in England Tests). महेंद्रसिंग धोनी ( 569), मोहम्मद अझरुद्दीन ( 468), अँजेलो मॅथ्यूज ( 431) आणि इम्रान खान ( 403) यांचा नंतर नंबर येतो. ( Virat Kohli is the first ever Asian captain to score 600+ Test runs in England.)