World Test Championship (WTC) final India vs New Zealand : आर अश्विननं न्यूझीलंडच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलची चुरस अधिक वाढवली आहे. भारतानं विजयासाठी ठेवलेल्या १३९ धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना किवींचे दोन्ही सलामीवीर ४४ धावांवर माघारी परतले आहेत. या कामगिरीसह आर अश्विननं WTCमध्ये विक्रमाला गवसणी घातली.
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीच्या सहाव्या दिवसाच्या पहिल्या सत्रातच भारताचे तगडे फलंदाज माघारी परतले. त्यानंतर रिषभ पंत वगळता तळाच्या फलंदाजांनाही अपयश आलं अन् टीम इंडियाचा दुसरा डाव १७० धावांवर गडगडला. टीम साऊदीला चार, ट्रेंट बोल्टला ३ व कायले जेमिन्सनला २ विकेट्स आणि निल वॅगनरनं एक विकेट घेतली. कोहली ( १३), पुजारा ( १५) आणि रहाणे ( १५) माघारी परतल्यामुळे टीम इंडियाच्या अडचणीत वाढ झाली. टीम इंडियाची अवस्था ५ बाद १०९ अशी केली. रिषभ पंत व रवींद्र जडेजा यांनी काही काळ संघर्ष केला, परंतु निल वॅगनरनं ही जोडी तोडली. त्यानंतर ट्रेंट बोल्टनं एकाच षटकात रिषभ व आर अश्विनला बाद केले. बघता बघता भारताचा दुसरा डाव १७० धावांवर गडगडला. WTC Final 2021, WTC Final 2021, Ind vs NZ Test Final
टॉम लॅथम व डेव्हॉन कॉनवे यांनी पहिल्या विकेटसाठी ३३ धावांची भागीदारी केली. आर अश्विननं सारा गेम पलटवला. त्यानं दोन्ही सलामीवीरांना ४४ धावांवर माघारी पाठवले. कर्णधार केन विलियम्सनलाही त्यानं पायचीत पकडले होते, परंतु DRSनंतर केन नाबाद असल्याचा निर्णय देण्यात आला. विराटच्या चेहऱ्यावरील हास्य हरवले. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक ७१ विकेट्सचा विक्रम आर अश्विननं पटकावला. त्यानं पॅट कमिन्सचा ७० विकेट्सचा विक्रम मोडला. त्यानंतर स्टुअर्ट ब्रॉड ( ६९), टीम साऊदी ( ५६) आणि नॅथन लियॉन ( ५६) यांचा क्रमांक येतो. IND vs NZ World Test Championship, WTC Final Today