Join us  

WTC Final 2021 IND vs NZ : क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं अन् भारतीय चाहत्याची झाली अशी अवस्था, Video

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या सहाव्या व निर्णायक दिवशी रिषभ पंत आणि रवींद्र जडेजा ही जोडी टीम इंडियासाठी तारणहार ठरेल, अशी सर्वांना अपेक्षा आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 5:22 PM

Open in App

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या सहाव्या व निर्णायक दिवशी रिषभ पंत आणि रवींद्र जडेजा ही जोडी टीम इंडियासाठी तारणहार ठरेल, अशी सर्वांना अपेक्षा आहे. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी पहिल्या सत्रात कर्णधार विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि उप कर्णधार अजिंक्य रहाणे यांच्या विकेट्स घेत टीम इंडियाची अवस्था ५ बाद १०९ अशी केली. रिषभ-रवींद्रनं लंच ब्रेकपर्यंत एकही विकेट पडू न देता धावसंख्या ५ बाद १३० वर नेऊन ९८ धावांची आघाडी मिळवून दिली आहे. कोहली व पुजारा माघारी परतल्यानंतर रिषभ व अजिंक्य हे चांगले खेळत होते आणि भारतीय चाहतेही खूश होते. पण, क्षणार्धात असं काही घडलं अन् भारतीय चाहत्याचा चेहऱ्याचा रंगच उडाला...  WTC Final 2021, WTC Final 2021

आयसीसीनं जाहीर केले राखीव दिवसाचे नियम; अंतिम एक तास ठरेल निर्णायक 

दुसऱ्या डावात भारताचा सलामीवीर शुबमन गिल अपयशी ठरला. रोहित शर्मा व  पुजारानं डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु रोहितला बाद करून टीम साऊदीनं ही जोडी तोडली. सहाव्या दिवशी कायले जेमिन्सनने धक्के दिले. कोहली ( १३), पुजारा ( १५) आणि रहाणे ( १५) माघारी परतल्यामुळे टीम इंडियाच्या अडचणीत वाढ झाली आहे.  रताच्या पहिल्या डावातील २१७ धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडनं २४९ धावा केल्या. कर्णधार केन विलियम्सन ( ४९) आणि टीम साऊदी ( ३०) यांनी दमदार खेळ केला. पाचव्या दिवसावर टीम इंडियाचे वर्चस्व पाहायला मिळाले. मोहम्मद शमीनं न्यूझीलंडला चार धक्के देत संपूर्ण डावच पलटवला. पण, केन विलियम्सनच्या चिवट खेळीनं अन् टीम साऊदीच्या फटकेबाजीनं किवींनी पहिल्या डावात ३२ धावांची आघाडी घेतली. WTC Final Today, Ind Vs NZ test Score, NZ vs IND Test today

पाहा नेमकं काय झालं...

टॅग्स :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाअजिंक्य रहाणेभारत विरुद्ध न्यूझीलंड