WTC Final 2021 IND vs NZ : आयसीसीनं जाहीर केले राखीव दिवसाचे नियम; अंतिम एक तास ठरेल निर्णायक 

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या सहाव्या व निर्णायक दिवशी टीम इंडियाला पूर्णपणे बॅकफूटवर गेलेली पाहायला मिळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 04:48 PM2021-06-23T16:48:52+5:302021-06-23T16:49:14+5:30

whatsapp join usJoin us
WTC final 2021 Ind vs NZ Test : Guide to the ICC World Test Championship Final's Reserve Day | WTC Final 2021 IND vs NZ : आयसीसीनं जाहीर केले राखीव दिवसाचे नियम; अंतिम एक तास ठरेल निर्णायक 

WTC Final 2021 IND vs NZ : आयसीसीनं जाहीर केले राखीव दिवसाचे नियम; अंतिम एक तास ठरेल निर्णायक 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या सहाव्या व निर्णायक दिवशी टीम इंडियाला पूर्णपणे बॅकफूटवर गेलेली पाहायला मिळत आहे. कर्णधार विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि उप कर्णधार अजिंक्य रहाणे यांच्या विकेट्स पडल्यानं टीम इंडियाची अवस्था ५ बाद १०९ अशी झाली आहे. भारताकडे आता ७७ धावांची आघाडी आहे आणि रिषभ पंत - रवींद्र जडेजा ही जोडी खेळपट्टीवर आहे. दरम्यान, या ऐतिहासिक कसोटीचा पहिला व चौथा दिवस पावसामुळे एकही चेंडू न खेळता वाया गेला. त्यात आजचा दिवस हा राखीव दिवस आहे आणि आज निकाल न लागल्यास दोन्ही संघांना संयुक्त जेतेपद दिले जाईल. राखीव दिवसासाठी आयसीसीनं नियमावली जाहीर केली आहे. ( Guide to the ICC World Test Championship Final's Reserve Day) 

टीम इंडियाचं जिंकणं अवघड, आता फक्त दोनच निकाल लागू शकतात; सुनील गावस्करांचं मोठं विधान 

कोहली ( १३), पुजारा ( १५) आणि रहाणे ( १५) माघारी परतल्यामुळे टीम इंडियाच्या अडचणीत वाढ झाली आहे.  रताच्या पहिल्या डावातील २१७ धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडनं २४९ धावा केल्या. कर्णधार केन विलियम्सन ( ४९) आणि टीम साऊदी ( ३०) यांनी दमदार खेळ केला. पाचव्या दिवसावर टीम इंडियाचे वर्चस्व पाहायला मिळाले. मोहम्मद शमीनं न्यूझीलंडला चार धक्के देत संपूर्ण डावच पलटवला. पण, केन विलियम्सनच्या चिवट खेळीनं अन् टीम साऊदीच्या फटकेबाजीनं किवींनी पहिल्या डावात ३२ धावांची आघाडी घेतली. 

दुसऱ्या डावात भारताचा सलामीवीर शुबमन गिल अपयशी ठरला. रोहित शर्मा व  पुजारानं डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु रोहितला बाद करून टीम साऊदीनं ही जोडी तोडली. सहाव्या दिवशी कायले जेमिन्सनने धक्के दिले. 

काय सांगतो राखीव दिवसाचा नियम? 
राखीव दिवसाचा कालावधी ३३० मिनिटे किंवा ८३ षटकांचा आहे. शेवटच्या सत्रात एका तासाने वेळ वाढवला जाऊ शकतो. कसोटी सामन्याच्या एकाही दिवशी ९८ षटकांचा खेळ झालेला नाही, त्यामुळे हा अतिरिक्त एका तासाचा खेळ होऊ शकतो.

पंच राखीव दिवसाच्या शेवटच्या तासाच्या खेळाला सुरूवात करण्याआधी संकेत देतील. दिवसाचा खेळ मध्यंतरात आला असताना दोन्ही संघांना निकाल लागला नाही असे वाटले तर दोन्ही कर्णधार एकमेकांशी बोलून सामना अनिर्णित राखण्याचा निर्णय घेऊ शकतात.
 

Web Title: WTC final 2021 Ind vs NZ Test : Guide to the ICC World Test Championship Final's Reserve Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.