WTC Final 2021 IND vs NZ : विराट कोहलीची न्यूझीलंडच्या फलंदाजासोबत स्लेजिंग, Video Viral

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याचा मैदानावरील स्वभाव हा आक्रमक आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 04:51 PM2021-06-22T16:51:20+5:302021-06-22T16:51:43+5:30

whatsapp join usJoin us
WTC final 2021 Ind vs NZ Test : 'He got no idea' - Virat Kohli sledges Tom Latham Video viral | WTC Final 2021 IND vs NZ : विराट कोहलीची न्यूझीलंडच्या फलंदाजासोबत स्लेजिंग, Video Viral

WTC Final 2021 IND vs NZ : विराट कोहलीची न्यूझीलंडच्या फलंदाजासोबत स्लेजिंग, Video Viral

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याचा मैदानावरील स्वभाव हा आक्रमक आहे. त्यामुळे प्रतिस्पर्धी फलंदाजासोबत स्लेजिंग करणं हे त्याच्यासाठी काही नवं नाही. क्षेत्ररक्षण करताना तो अनेकदा मुद्दाम प्रतिस्पर्धी फलंदाजाला डिवचतो. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये न्यूझीलंडच्या फलंदाजालाही विराटनं डिवचण्याचा प्रयत्न केला.  

WTC Finalच्या तिसऱ्या दिवशी विराटची स्लेजिंक कॅमेरात कैद झाली. न्यूझीलंडचा सलामीवीर टॉम लॅथम याचं लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न विराट करताना दिसला. न्यूझीलंडच्या डावातील चौथ्या षटकात हा प्रसंग घडला. जसप्रीत बुमराहच्या  गोलंदाजीवर कोहली लॅथमसोबत स्लेजिंग करत होता. 


दरम्यान,  WTC  फायनलचा पहिला व चौथा दिवस पावसामुळे एकही चेंडू न टाकता रद्द करावा लागला. किवी गोलंदाजांनी टीम इंडियाचा पहिला डाव 217 धावांवर गुंडाळला. कायले जेमिन्सननं पाच विकेट्स घेतल्या.  त्यानंतर टॉम लॅथम व डेव्हॉन कॉनवे यांनी 70 धावांची सलामी देताना टीम इंडियाला हैराण केले. आर अश्विन व इशांत शर्मा यांनी किवी सलामीवीरांना माघारी पाठवले आहे. रॉस टेलर व केन विलियम्सन ही अनुभवी जोडी मैदानावर आहे आणि पाचव्या दिवशी ५९ षटकांत २ बाद ११२ धावांवर ही जोडी खेळत आहे. 

Web Title: WTC final 2021 Ind vs NZ Test : 'He got no idea' - Virat Kohli sledges Tom Latham Video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.