World Test Championship (WTC) final India vs New Zealand : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या सहाव्या व निर्णायक दिवशी टीम इंडियाला पहिल्या सत्रात दोन मोठे धक्के बसले. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीत कालच्या २ बाद ६४ धावांवरून सहाव्या दिवसाची सुरुवात करणाऱ्या टीम इंडियाला ७ धावांची भर घातल्यानंतर हा धक्का बसला. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ( १३) आणि चेतेश्वर पुजारा ( १५) या सेट जोडीला कायले जेमिन्सनने माघारी पाठवले. सहाव्या दिवशी न्यूझीलंडसमोर मोठी धावसंख्या उभारून टीम इंडिया सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करेल, असे वाटत होते. मात्र, या दोन विकेट्सनं संपूर्ण समिकरण बिघडवले. त्यात महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी मोठं विधान केलं. ( Sunil Gavaskar gives his verdict on possible results on WTC Final reserve day)
RCBच्या भीडूनं विराट कोहलीचा गेम केला; IPLच्या नेट्समध्ये ठरला होता प्लान अन्...
भारताच्या पहिल्या डावातील २१७ धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडनं २४९ धावा केल्या. कर्णधार केन विलियम्सन ( ४९) आणि टीम साऊदी ( ३०) यांनी दमदार खेळ केला. पाचव्या दिवसावर टीम इंडियाचे वर्चस्व पाहायला मिळाले. मोहम्मद शमीनं न्यूझीलंडला चार धक्के देत संपूर्ण डावच पलटवला. पण, केन विलियम्सनच्या चिवट खेळीनं अन् टीम साऊदीच्या फटकेबाजीनं किवींनी पहिल्या डावात ३२ धावांची आघाडी घेतली. भारताने सलामीची विकेट लगेच गमावली असली तरी रोहित शर्मा व चेतेश्वर पुजारानं टीम इंडियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. टीम साऊदीनं ही जोडी तोडली. रोहित व चेतेश्वर यांनी दुसऱ्या विकेटसाठी २७ धावांची भागीदारी केली. भारतानं पाचव्या दिवसअखेर २ बाद ६४ धावा करून ३२ धावांची आघाडी घेतली होती.
सुनील गावस्कर काय म्हणाले?पाचव्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा सुनील गावस्कर म्हणाले होते की,''भारताला अखेरच्या दिवशी वेगानं धावा कराव्या लागतील. न्यूझीलंडसमोर तगडं आव्हान उभं केल्यानंतर गोलंदाजांनी त्यांचा दम दाखवायला हवा. पण, सध्याच्या स्थितीत तरी भारत हा सामना जिंकेल, हे अवघड आहे. आता दोनच निकाल शक्य आहेत, एक म्हणजे ड्रॉ आणि दुसरा न्यूझीलंड विजेता. भारतीय गोलंदांना न्यूझीलंडचा दुसरा डाव गुंडाळता येणं कठीण आहे. ''