World Test Championship (WTC) final India vs New Zealand : 1877 साली पहिला कसोटी सामना खेळवण्यात आला आणि तब्बल 144 वर्षांनी पहिली कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल खेळवली जात आहे. त्यात हा जेतेपदाचा सामन्यात टीम इंडिया असल्यानं अनेकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. भारत-न्यूझीलंड हे दोन तगडे संघ आजपासून WTC Final 2021च्या जेतेपदासाठी मैदानावर उतरण्यास सज्ज आहेत, परंतु त्यांच्या आनंदावर पाणी फिरण्याची शक्यता आहे. इंग्लंडच्या साऊदॅम्टन येथे होणाऱ्या या लढतीवर पावसाची वक्रदृष्टी पडली आहे आणि आताही तेथे पाऊस सुरू आहे. त्यामुळे दुपारी 3.30 वाजल्यापासून सुरू होणाऱ्या या कसोटीचे पहिले सत्र रद्द होण्याची शक्यता बळावली आहे. WTC Final 2021, WTC Final 2021
भारतीय संघानं जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी ( ICC World Test Championship ) अंतिम ११ सदस्यीय संघांची घोषणा केली आहे. विराट कोहलीच्या ( Virat Kohli) नेतृत्वाखालील संघात रोहित शर्मा, शुबमन गिल यांना संधी देण्यात आली आहे. तर यष्टीरक्षक म्हणून रिषभ पंतला स्थान देण्यात आलं असून वृद्धीमान साहा याला डगआऊटमध्येच बसावं लागणार आहे. Ind vs NZ Test Final, WTC final 2021
असा आहे भारतीय संघ- रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रिषभ पंत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी IND vs NZ World Test Championship
न्यूझीलंडचा संघ - केन विलियम्सन ( कर्णधार), टॉम ब्लंडल, ट्रेंट बोल्ट, डेव्हॉन कॉनवेय, कॉलीन डी ग्रँडहोम, मॅट हेन्री, कायले जेमिन्सन, टॉम लॅथम, हेन्री निकोल्स, अजाझ पटेल, टीम साऊदी, रॉस टेलर, नेल वॅगनर, बीजे वॉटलिंग, विल यंग