World Test Championship (WTC) final India vs New Zealand : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या पाचव्या दिवसाची ७ षटकं पावसामुळे वाया गेली. भारतीय वेळेनुसार ४ वाजता भारत-न्यूझीलंड यांच्यातल्या कसोटीच्या पावच्या दिवसाचा खेळ सुरू झाला. जसप्रीत बुमराहनं पहिले षटक फेकले अन् त्यात एक नो बॉल टाकला. पण, हे षटकं पूर्ण होताच जसप्रीत बुमराह ड्रेसिंग रुमच्या दिशेनं धावत सुटला. नेमकं काय झालं हे सुरुवातीला कोणालाच काही कळलं नाही. पण, त्यानंतर त्यानं केलेली चूक सोशल मीडियावर व्हायरल झाली. ( Jasprit Bumrah running back to dressing room to change the jersey after the first over)
WTC फायनलचा पहिला व चौथा दिवस पावसामुळे एकही चेंडू न टाकता रद्द करावा लागला. दुसऱ्या व तिसऱ्या दिवशीही पावसानं अडथळा आणला, परंतु आतापर्यंत १४१ षटकांचा सामना झाला आहे. आजच्या पावच्या दिवसाचा खेळही पावसामुळे उशीरानं सुरू झाला. साऊदॅम्प्टन येथील हवामानाचा लहरीपणा लक्षात घेता उर्वरीत दोन दिवसांत १९६ षटकांचा खेळ होणे अशक्य आहे. तिसऱ्या दिवशी किवी गोलंदाजांनी टीम इंडियाचा पहिला डाव 217 धावांवर गुंडाळला. कायले जेमिन्सननं पाच विकेट्स घेतल्या. IND vs NZ World Test Championship
सामना ड्रॉ झाला तर?; सुनील गावस्कर यांचा ICCला सल्ला, ठरेल विजेता संघ!
त्यानंतर टॉम लॅथम व डेव्हॉन कॉनवे यांनी 70 धावांची सलामी देताना टीम इंडियाला हैराण केले. आर अश्विन व इशांत शर्मा यांनी किवी सलामीवीरांना माघारी पाठवले आहे. रॉस टेलर व केन विलियम्सन ही अनुभवी जोडी मैदानावर आहे आणि तिसऱ्या दिवसअखेर किवींच्या 2 बाद 101 धावा झाल्या आहेत. चौथ्या दिवशी एकही चेंडू टाकता आला नाही, पावसामुळे संपूर्ण दिवस पाण्यात गेला. WTC final 2021, Ind vs Nz WTC Final Today
जसप्रीत बुमराहनं टीम इंडियाची नियमित कसोटीची जर्सी घातली होती. तो WTC फायनलसाठी तयार केलेली विशेष जर्सी घालायला विसरला अन् पहिलं षटकं फेकल्यानंतर ही बाब त्याच्या लक्षात आली अन् तो जर्सी बदलण्यासाठी ड्रेसिंग रुममध्ये धावत गेला. WTC Final Today, Ind Vs NZ test Score, NZ vs IND Test today